वैद्यकीय ईच्छापत्र अर्थात म्रुत्युपत्र…..

आज दिनांक 8मार्च 2017 रोजी मी माधव संताजी अटकोरे वय 72 वर्ष,राहणार तथागत नगर,तरोडा खुर्द,मालेगाव रोडवर नादेड माझे वैद्यकीय इच्छापत्र अर्थात म्रुत्युपत्र स्वखुशीने ,कोणताही दबाव अथवा नशापाणी न घेता लिहून देतो कि,मी जर कोणत्याही अपघाताने किवा शारीरिक व्याधीने मेन्दूम्रत झालो तर मला दुरूस्त करण्यासाठी,वाचविण्याच्या ईच्छेपोटी उपचारादरम्यान पैसे खर्च करू नका कारण मेन्दूम्रत व्यक्ती दुरूस्त होण्याची शक्यताच नसते . अशा जीवनाच्या अन्तिम प्रसंगी दुख अथवा विलाप न करता स्वताच्या मनावर ताबा ठेवा.आणि विनाकारण नातेवाईक आणि मित्राना बोलावून नाहक त्रास देऊ नका.कारण अशा अवस्थेत जगण्याची शक्यताच नसते हे समजून घेऊन येणार्या प्रसंगाचा सामना करण्याचे साहस दाखवा.

मेन्दूम्रत अवस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे अवयव काढून घेण्याची सुचना डॉक्टराना द्या ज्यामुळे कोणत्यातरी गरजू रुग्णाचा जीव वाचविण्याच्या उपयोगी पडतील.

 

मेन्दूम्रत अथवा नैसर्गिक म्रुत्युनतर माझे अवयव दान करण्यासाठी मी हे वचनपत्र भरून देतील आहे त्याचा आपण आदर करून माझ्यावरील प्रेम दाखवावे.

 

म्रुत्युनतर मला गरम पाण्याने आन्घोळ घालू नका ,स्मशानभूमीत नेण्यासाठी तिरडी सजवू नका ,नातेवाईकांना बोलावून त्रास देऊ नका.कोणताही विधी करू नका कारण तुम्ही काहीही केले तरी मी जीवन्त होणार नाही हे सत्य मनाला पटवून द्या.

माझ्या म्रुत्युनतर संपत्तीचे वाटप हा मुद्दाच नाही कारण माझ्या नावाने संपत्ती जमा करण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नाही.खुप कष्ट केले .ईमान कधीच विकले नाही.पत्रकारीता करताना पैसे हडप करण्याचे अनेक प्रसंग आले परंतु कोणाला जाचक ठरून पैसे कमविणे मला कधीच पटले नाही म्हणून मी आज जरी कफल्लक असलो तरी मनाने पुर्ण पणे समाधानी आहे .

जगताना कमी गरजा ठेवून समाधानाने जगलो.जीवनात लबाडी केलीच असेल तर ती फक्त उपाशीपोटी असतानाच केली .

 

मुलांनाही असेच ईमानदारीने जगण्याचा सस्कार दिला .म्हणून माझी मुले आज अतिशय चांगल्या पध्दतीने जीवन जगत आहे त्याचेही समाधान आहे.

 

मी जर वयाच्या 72 वर्षात मरण पावलो तर एकच काम करा माझ्या वया इतके वृक्षारोपण करून त्याची जोपासना करा.झाडे मोठी होतील. ती फुले ,फळे ,सावली देतील आणि पर्यावरणाला सहाय्यक बनतील .माझी पुण्य तिथी वगैरे करण्यासाठी पैसे खर्च करू नका त्यामूळे काहीही साध्य होणार नाही.

मी हे वैद्यकीय इच्छापत्र पुर्ण समाधानाने लिहून देत आहे .यासाठी दोन साक्षीदार देत आहे .एक भिमराव ईरबाजी तरटे आणि दुसरे लक्ष्मण चोखाजी जाधव ….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *