नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस खात्यात अशोभनीय वर्तन करत फिर्यादीला न्याय न देणाऱ्या हिंगोली येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकाविरुध्द हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या गुन्ह्याचा तपास आता पोलीस उपनिरिक्षकाकडे देण्यात आला आहे.
हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विकास शेकुराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस नि रिक्षक सुनिल महादेव गिरी यांना 6 जुलै 2022 रोजी पासून ते 18 ऑगस्ट 2023 पर्यंत त्यांच्याकडे प्रलंबित असणारे गुन्हे निकाली काढण्यासंदर्भाने सुचना केली असतांना त्यांनी ते गुन्हे विनाकारण प्रलंबित ठेवले. तसेच फिर्यादीला न्याय देण्याची जबाबदारी हेतुपुरस्सर टाळली आहे. आरोपीविरुध्द तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोप ठेण्याचे कर्तव्य असतांना आरोपीला सहाय्य व्हावे या हेतुने गुन्हे प्रलंबित ठेवले आहेत.
हिंगोली विभागातील पोलीस उपअधिक्षक प्रशांत देशपांडे यांनी याप्रकरणी पोलीस ठण्यात भेट देवून योग्य सुचना दिल्या. विकास पाटील यांच्या तक्रारीवरुन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल महादेव गिरी सध्या नेमणुक हिंगोली नियंत्रण कक्ष यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 217 आणि मुंबई पोलीस कायद्याचे कलम 145 (2)(क) नुसार गुन्हा क्रमांक 706/2023 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक ठेंगे यांच्याकडे देण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल महादेव गिरी हे नामांकित व्यक्तीमत्व आहे. त्यांनी एकदा पोलीस उपअधिक्षक विभागातील नाईट गस्त करत असतांना औंढा येथे मद्य प्राशन करून केलेल्या गडबडीसाठी त्यांच्याविरुध्द औंढा पोलीस ठाण्यात 85(1) दारु बंदी कायद्यानुसार सुध्दा गुन्हा दाखल आहे. त्यावेळी औंढाचे पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे हे होते.
गुगलवर माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतांना भारतीय दंड संहितेच्या कलम 217 चा गुन्हा सिध्द झाला तर 7 वर्षापर्यंत सक्तमजुरीची शिक्षा आणि द्रव्य दंड प्रस्तावित आहे. हा गुन्हा अजामीन पात्र असून दखलपात्र आहे.
हिंगोलीच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाविरुध्द सात वर्षाची शिक्षा प्रस्तावित असणारा गुन्हा दाखल