दौऱ्यामध्ये दिरंगाई व हलगर्जीपणा चालणार नाही
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागाच्या योजना राबविल्या जातात. मात्र या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचता की, नाही व त्याची योग्य अंमलबजावणी होती की नाही. या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी आठवड्यातून दोन दिवस पंचायत समितीनां भेटी द्याव्यात अशा सुचना मुख्य कार्यकारी मिनल करनवाल यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषरदेच्या मार्फत राबवल्या जातात. या योजना ग्रामीण पातळीवर पोहचतात किंवा या योजनेची योग्य अंमलबजावणी होती करी, नाही याची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी विभागप्रमुखांना आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बुधवार आणि गुरूवारी पंचायत समितींना भेटी देवून त्या ठिकाणची माहिती, अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात यावे.
जिल्हा परिदेच्या मार्फत ग्राम पंचायत स्तरावरील ग्रामपंचाय, अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा पशुसंवर्धन, घरकुल, जलसंधारण, कृषी, मनरेगा व स्वच्छता विषयक योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेणे व योजनेची प्रभावीपणे अंमलबाजावणी व योजना विहीत मुदतीत पुर्ण होण्याच्या अनुशंगाने विभाग प्रमुखांनी पंचायत समितींना भेटी देवून आढावा घ्यावा. यामध्ये प्रत्यक्ष योजनेची अंमलबजावणी किंवा त्या योजना राबविण्यात येतात की, नाही त्याची पाहणी करणे व या योजना योग्यवेळेमध्ये राबवल्या ज्याव्यात. त्याचे नियोजन करण्यात यावे. व त्याचा वेळोवेळी अहवाल जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा. या दौऱ्यामध्ये दिरंगाई व हालगर्जीपणा होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. असे निर्देश सीईओ करनवाल यांनी दिले आहेत.
यामध्ये दि.23, 24, 31 ऑगस्ट या महिन्यात तीन दिवसात विविध विभागप्रमुखांनी दौरे करून अहवाल जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा. यात प्रत्येक विभाग प्रमुखांना तीन-तीन तालुके देण्यात आले आहे.