नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंडगिरीचे भयावह चित्र

नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास नांदेडकडून सिडकोकडे जाणाऱ्या दुधडेअरीजवळ एक युवक तलवारीने दुचाकीचे डायर पंम्चर करत असल्याचे चित्र व्हाटसऍप संकेतस्थळांवर व्हायरल झाले. यावरुन सिडको भागात गुंडगिरी कशा पध्दतीने चालत आहे. याचे चित्र उघड होते.
काल दि.20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास सिडको भागातील दुधडेअरीजवळ एक युवक दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 सी.जी.4389 च्या टायरला तलवारीसारख्या धार-धार शस्त्राने पंम्चर करत असल्याचे एक चित्र व्हाटसऍप संकेतस्थळावर व्हायरल झाले. त्या ठिकाणी एक ऍटो उभा आहे. दुसरी एक दुचाकी उभी आहे. काही लोक पायी जात असतांना दिसत आहेत. एक युवक आपले हात बांधून दुचाकीचे चाक पंम्चर करण्याची प्रक्रिया पाहत आहे.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार ही गाडी पंम्चर करण्याचा प्रयत्न म्हणजे हा काही तरी वसुलीचा प्रकार आहे असे त्या भागातील लोकांनी सांगितले. यावरून सायंकाळी 6 वाजता घडलेल्या या प्रकारामुळे आज विचार करण्याची वेळ आहे की, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंडगिरीची परिसिमा कुठपर्यंत पोहचली आहे. यावर काही तरी उपाय योजना होण्याची नक्कीच गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *