नांदेड(प्रतिनिधी)-सविता गायकवाड यांच्यावरील खोटा जिवघेणा हल्याच्या प्रकारात शिल्लक राहिलेला आरोपी आज हस्तांतरण वॉरंटनंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविला आहे.
दि.9 जानेवारी 2023 रोजी रात्री 11.15 वाजेच्यासुमारास बाफना उड्डाणपुलावर माझ्यावर जिवघेणा हल्ला झाला आणि मला गोळीबार करून जिवघेण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार सविता बाबुराव गायकवाड या सामाजिक कार्यकर्त्या महिलेने दिली होती. या बाबत इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 12/2023 दाखल झाला होता. या गुन्ह्यात किरण सुरेश मोरे (26), गोपिनाथ बालाजी मुंगल (33), विकास चंद्रकांत कांबळे(27) यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात गुन्हाच खोटा असल्याने फिर्यादी सविता बाबुराव गायकवाड यांनाही अटक झाली. या प्रकरणातील एक गुन्हेगार अवधुत उर्फ लहुजी गंगाधर दासरवाड (24) रा.बळीरामपुर हाा दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये अटक झाला होता आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात होता. त्याचे हस्तांतरण वॉरंट घेवून पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांनी त्यास अटक केली आणि त्यास न्यायालयात हजर केले. याच्याकडे असलेले पिस्तुल जप्त करायचे आहे यासाठी पोलीस कोठडी हवी असल्याचे सांगितले. न्यायालयाने पोलीसांच्या विनंतीनुसार अवधुत उर्फ लहुजी गंगाधर दासरवाड यासह एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सविता गायकवाड गोळीबार प्रकरणातील एकाला पोलीस कोठडी