नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील इंग्लिश माध्यमातील शाळा नागार्जुना पब्लिक स्कूलला आता जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या समक्ष उद्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी 18 ऑगस्ट रोजी करिता असे लिहून स्वाक्षरी केलेल्या पत्रकाप्रमाणे ही हजेरी लावण्यात आली आहे. वास्तविक करिता असे लिहून स्वाक्षरी करण्यास बाबत महाराष्ट्र शासनाने सविस्तर शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे.त्या नूसार करिता लिहून स्वाक्षरी करणे अत्यंत गरजेचे असेल तरच तसे करायचे आहे आणि करिता लिहणार् या व्यक्ती ने आपले नाव आणि पद सुद्धा लिहणे गरजेचे आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारीयांच्यावतीने 17 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या प्रष्ठांकनानुसार 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या कक्षात सुनावणीसाठी उपस्थित राहावे,असे आदेश नागार्जुन पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक यांना जारी केलेल्या पत्र क्रमांक 4065 मध्ये लिहिले आहे. या पत्रासोबत या पत्राच्या प्रतिलिपी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड, अध्यक्ष आणि सचिव विद्यादीप एज्युकेशनल सोशल अँड कल्चरल तेलगू सोसायटी नांदेड, तसेच या घटनेतील पीडित शिक्षक अविनाश चमकुरे, अतुल राजूरकर, मंगला वाघमारे, नामदेव शिंदे, बालाजी पाटील, सौ निशा गुडमवार यांना सुद्धा या सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे.
नागार्जुना पब्लिक स्कूल मधील सहा शिक्षक बिना वेतनाच्या त्रासले आहेत. त्यांना शाळेने सध्या काम थांबवण्यास सांगितले आहे. या शिक्षकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भाने अनेक कार्यालयांचे उंबरठे तर झिजवलेच, सोबतच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुद्धा दाद मागितले आहे. तरी शाळा प्रशासन त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना यश येऊ देत नाही, असा शिक्षकांचा आरोप आहे. या शाळेत शिक्षकांची आर्थिक पिळवणूक कशी होते, शिक्षक कसे त्रासले आहेत, त्यांना काय त्रास आहे, यासंदर्भाचे अनेक वृत्त वास्तव न्यूज लाईव्हने आपल्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेले आहेत. 17 ऑगस्ट रोजी हे सहा शिक्षक हे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना भेटले. त्यानंतर आता 22 ऑगस्ट रोजी शाळा प्रशासन शिक्षक आणि शिक्षणाधिकारी यांच्यासह त्या विभागातील अनागोंदीची चौकशी मीनल करणवाल करणार आहेत. या अगोदर सुद्धा या शाळेबद्दल काय काय चांगले काय काय वाईट अहवाल आहेत, याचाही शोध घेण्यासाठी मीनल करणवाल यांनी शिक्षण विभागाला सांगितले पाहिजे तर बरेच मोठे सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. म्हणजेच आता नागार्जुन स्कूलची क्लास मीनल करणवार घेणार आहेत.
उद्या मंगळवार आणि परवा बुधवार अशा दोन दिवसांसाठी महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त मांढरे हे सुद्धा नांदेड दौऱ्यावर येत आहेत. मीनल करणवाल यांनी त्यांच्या समक्ष या शाळेचा अहवाल सादर केला तर पीडित शिक्षकांना न्याय मिळण्याची शक्यता अजून वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2023/08/15/नागार्जुना-पब्लिक-स्कुलप/