नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सुजलेगाव ता.नायगाव येथील शेतजमीनीवर असलेला बोजा काढून घेण्याकरीता 2 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याविरुध्द नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुजलेगाव गावातील सुभाष गंगाराम नव्हारे (49) यांच्यासह अनेक जणांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 ते 2.30 या वेळेदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर रस्त्यावर नायगाव येथे सुजलेगाव येथे राहणारा व्यक्ती राजरत्न सटवाजी डुमणे याने नायगाव तहसीलदारांनी आमच्या शेत जमीनीवर चढविलेला बोजा काढूण देण्यासाठी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. जर मलाा दोन लाख रुपये दिले नाहीत तर तुमची जमीन जप्त करायला लावतो, तुम्हाला जेलमध्ये पण टाकायला लावतो अशा धमक्या दिल्या. पोलीस ठाणे नायगाव यांनी या बाबत राजरत्न सटवाजी डुमणेविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 385 नुसार गुन्हा क्रमांक 125/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शिवकुमार बाचावार करत आहेत.
तहसीलदारांनी चढविलेला बोजा कमी करून देण्यासाठी 2 लाखांची खंडणी मागितली