तुरूंगात कायद्याच्या महापंडीताला काही कायदे पंडीतांनी धुवून काढले

नांदेड(प्रतिनिधी)-तुरूंगात गेल्यावर अशिक्षीत व्यक्ती सुध्दा कायद्याचे महापंडीत होतात.पण अगोदरच कायद्याचा महापंडीत असलेला एक अशिक्षीतांसोबत तुरूंगात गेला तेथे काही उच्च विद्याविभुषीतपण होते आणि काही शुन्य माहिती असणारे पण होते. त्यामुळे अगोदर विद्याविभुषीत झालेला तेथे भाई बनू लागलाा आणि या भाईगिरीमध्ये कोठे तरी शब्दांची हेरफेर झाली आणि काही जणांनी महापंडीताची चांगलीच धुलाई केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पण यासंदर्भाने कायदेशीररित्या कोणीच दुजोरा द्यायला तयार नाही.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात वर्ग-1 पदावर कार्यरत असलेल्या एका कायद्याच्या महापंडीताला नांदेड पोलीसंानी वाशिम पोलीस अधिक्षकांच्या कक्षातून ताब्यात घेवून नांदेडला आणले. त्याच्याविरुध्द जिवघेणा हल्लासह मकोका कायद्याप्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. अगोदरच कायद्याचा महापंडीत असलेला हा महाभाग जानेवारी 2020 पासून तुरूंगात आहे. कधीकाळी ज्यांना तुरूंगात टाकले ते सुध्दा अनेक खोट्या प्रकरणांमध्ये ती मंडळी सुध्दा तुरूंगात हजरच होती.

कधी-कधी घरी सुध्दा न्याहरी आणि जेवण मिळण्यास उशीर होतो. परंतू सध्या मानवी हक्क आयोगाच्या नावावर तुरूंगात सुध्दा संपुर्ण सुविधा आहे. कोणतीही बाब वेळेतच मिळते. वाचण्यासाठी वर्तमान पत्र आहेत, मासिके आहेत, टी.व्ही.आहे, व्यायाम शाळा आहे. परंतू शेवटी ते तुरुंगच आहे आणि याचा प्रभाव मानसिकेतवर होतो आणि त्या मानसिकतेतून नवीन कल्पना जन्म घेतात आणि त्या कल्पनांमधून गरुडासारखी भरारी मारण्याची इच्छा जागृत होते. परंतू कितीही विचार केला तरी गरुडाची बरोबरी करणे अशक्यच आहे. तो हवेतून पाण्यात असलेल्या माशाला ओळखतो आणि झेप मारतांना त्याला पकडूनच पुन्हा झेप घेतो.

अशाच पध्दतीने हा कायद्याचा महापंडीत तेथे इतर महापंडीतांचा भाई होण्याच्या तयारीला लागला. काही दिवस काही जण त्याला भाई समजू पण लागले. परंतू समाजात ज्या जबाबदारीसाठी तो उतरला होता. त्या जबाबदारीला शिंक्यावर टांगून सर्व काही बेकायदेशीरच करू लागला.त्यामुळे महापंडीत आणि पंडीत यांच्यामध्ये वाद विवाद झाले आणि दोन दिवसांपुर्वीच काही पंडीतांनी एकजुटीने महापंडीताची तुरूंगात चांगलीच धुलाई केल्याची चर्चा दि.21 ऑगस्ट रोजी तुरूंगातून आलेल्या एकाने जाहीर केली. प्रशासनिक स्तरावर याबाबीला कोणी दुजोरा देत नाही. तुरूंगाच्या प्रशासनाने सुध्दा याची कोठे नोंद केल्याची माहिती नाही. तुरूंग अधिक्षक तर अनेकदा न्यायालयात चकरा मारून माझ्याकडील काही पंडीतांना दुसऱ्या तुरूंगात पाठवा अशी विनवणी करता-करता थकून गेले आहेत. परंतू महापंडीताची पंडीतांकडून झालेली धुलाई आज मात्र उघड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *