नांदेड महसुल विभागाची वाळू माफियांवर मोठी कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-भनगी-पिंपळगाव येथील गोदावरी नदीपत्रात अवैधरित्या रेती उपसा होत असल्याची माहिती महसुल विभागाला प्राप्त झाल्यानंतर मंगळवारच्या पहाटे महसुल विभागाच्या पथकाने कार्यवाही करत वाळू उपसा करणारे इंजन आणि रेती जप्त केली.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार संजय वारकड याबरोबर मंडळाधिकारी आणि तलाठील या पथकाने प्रत्यक्ष वाळू घाटावर जाऊन अवैधरित्या उपसा होत असलेल्या भानगी तालुका नांदेड येथे मोठी कारवाई केली आहे.या कारवाईमध्ये 12 वाळू उपसा करणारे इंजिन ज्याची किंमत प्रत्येकी तीन लाख रुपये आहे असे 36 लाख रुपये किमतीचे इंजिने जप्त करून क्रेनच्या साह्याने हयवा मध्ये आणून तहसील कार्यालयामध्ये जमा केली आहे. तसेच मौजे भनगी येथे व पिंपळगाव निमजी येथून 125 ब्रास वाळू जप्त केली आहे. या कारवाईमध्ये नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस उपनिरीक्षक मठवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप, पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर बटवाड मंडळ अधिकारी प्रफुल्ल खंडागळे , अनिरुद्ध जोंधळे, कुणाल जगताप, अनिल धुळगंडे, राजेंद्र शिंदे, तलाठी माधव भिसे , माधव पाटील, रमेश गिरी, सचिन नरवाडे, उमाकांत भांगे, कैलास सूर्यवंशी, विजय रनविरकर, वाहन चालक जाहीर खान, किरण श्रीवास्तव तसेच 20 मजूर, तहसील कार्यालयाचे बोट चालक इत्यादींनी मिळून कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *