राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सुर्यकांत ढवळे यांचा दौरा कार्यक्रम

 नांदेड (जिमाका) –  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सुर्यकांत ढवळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

बुधवार 23 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई येथून खाजगी वाहनाने नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समवेत (Aepds) अंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी  प्राथ. व प्रशासकीय अधिकारी शा.पो.आ.मनपा याचे समवेत पोषण आहार योजनेअंतर्गत माहे एप्रिल 2022 ते जुलै 2023 पर्यत नियतन, उचल वाटपाचा आढावा. दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहर व ग्रामीण यांचे समवेत महिला व बालविकास योजना अंतर्गत कच्चे धान्याचा माहे एप्रिल 2022 ते जुलै 2023 पर्यत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कृषि अधिक्षक यांचे समवेत नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर चर्चा. दुपारी 3 ते 6 या कालावधीत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.

 

गुरुवार 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30 ते 5.30 या कालावधीत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेव अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. शुक्रवार 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30 ते 5.30 या कालावधीत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी. सायं 6. वा. खाजगी वाहनाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *