नांदेड(प्रतिनिधी)-भारताने चंद्रयान-3 मधील विक्रमच्या माध्यमातून चंद्रावर पाय ठेवले. हा भारताचा अंतरिक्षात शंकनाद आहे असे प्रतिपादन दक्षीण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज सायंकाळी 5.44 वाजता भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षीण धु्रवावर उतरत असतांना नरेंद्र मोदी दक्षिण अफ्रिकेतून इस्त्रो आणि भारतीय वैज्ञानिकांसोबत व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे सहभागी झाले होते. सायंकाळी 5.55 वाजता भारताचे चंद्रयान उभ्या रेषेत चंद्राकडे जात असतांना सर्वांचा जीव गळ्यात आला होता. इस्त्रोचे मुख्य एस.सोमनाथ यांनी चंद्रयान-3 ने चंद्रावर विक्रमद्वारे पाय रोवताच टाळ्यांचा कडकडाट केला आणि एस.सोमनाथ यांनी भारताच्या पंतप्रधानांना आम्ही यशस्वी झाल्याची माहिती दिली.
त्यावेळी भारताचे पंतप्रधान यांनी हातात तिरंगा घेवून टाळ्या वाजवल्या. याप्रसंगी पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले अब चंदा मामा दुरके नहीं, तसेच भारतीय वैज्ञानिकांना शुभकामना दिल्या. भारतीय लोकांना याबद्दल सांगतांना नरेंद्र मोदी म्हणाले आम्ही आता अंतरिक्षात शंखनाद केला आहे. सोबतच आता चंद्रावरच्या व्याख्या बदलतील आणि त्याबद्दलच्या आस्था बदलतील. नवीन समीकरणे तयार होतील आणि त्यातून आम्ही जगाला नवीन माहिती देवू.
याप्रसंगी जगाला संबोधीत करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीमध्ये बोलले आणि म्हणाले आजच्या चंद्रयान -3 चे यशस्वी प्रदार्पण माझे एकट्याचे नसून त्यासाठी जगाची आमच्यासोबत असलेली शुभकामना महत्वपुर्ण आहे. चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आम्ही गगण यान प्रक्षेपणासाठी तयार ठेवलेले आहे. आणि आम्ही त्याद्वारे शुक्रग्रहावर जाणार आहोत. आजचा दिवस जग लक्षात ठेवील की, भारत हा पहिला देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षीण धु्रवावर आपला विक्रम उतरवला आहे.
अंतरिक्षा भारताने केला शंखनाद-नरेंद्र मोदी