किनवट रेल्वे स्थानकावर चालू झालेल्या रेल्वे गाडीत चढण्याचा प्रयत्न करणारा युवक गंभीर जखमी

किनवट(प्रतिनिधी)-आज सकाळी 8.30 वाजता किनवटकडून येणाऱ्या इंटरसिटी या रेल्वे गाडीत चढतांना एक 25 वर्षीय युवक पाय घसरून रेल्वेखाली गेला आणि गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे विभागातर्फे नेहमीच ही सुचना देण्यात येते की, चालू झालेल्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करू नका. पण कानाडोळा केल्यामुळे अशा दुर्घटना घडतात.
किनवट येथून नांदेडकडे येणारी इंटरसिटी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी किनवट रेल्वे स्थानकावरून सकाळी 8.30 वाजता सुरू झाली. त्यावेळी गाडी सुरू झाल्यानंतर त्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करणारा युवक महेश कनाके (अंदोजे वय 25 वर्ष) याने रेल्वे डब्यातील आजू-बाजूला असलेले स्टीलचे रॉड पकडण्याचा प्रयत्न केला आणि द ुर्देवाने त्याच्या संतुलनात काही तरी बिघडले आणि तो रेल्वेखाली गेला. रेल्वे स्थानकावर गर्दी नव्हती. स्थानकावरील लोक आणि रेल्वे गाडीतील लोकांनी आरडा ओरड केल्यानंतर चालकाने गाडी थांबवली. परंतू तो पर्यंत उशीर झाला होता. जखमी युवकास अत्यंत घाईगर्दीत गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतू काही जणांनी सांगितले की, त्याचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेले असल्यामुळे त्याची अवस्था गंभीर आहे . म् हणून त्याला पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील आदीलाबाद येथे पाठविण्यात आले आहे.
आज किनवट रेल्वे स्थानकावर घडलेली दुर्घटना ही काही पहिली नाही. चालत्या रेल्वे गाडीत चढले आणि उतरणे ह्या दोन्ही घटना धोकादायक आहेत याच्या सुचना रेल्वे विभाग त्यांच्या ध्वनीक्षेपकावरून नेहमी करत असतात. आपण शिकलो सवरलो आहोत. पुर्वीच्या कोळसा इंजिनच्या गाड्यांना वेग धरण्यासाठी वेळ लागत होता.आता डिझेल इंजिन आणि विद्युत इंजिन झाल्यानंतर या गाड्यांच्या सुरूवातीच्या वेगामध्ये 100 पटीने फरक पडला आहे. महेश कनाके लवकर बरा होवो या शुभेच्छांसह वास्तव न्युज लाईव्ह जनतेला आवाहन करत आहे की, चालत्या रेल्वे गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका.
संबंधीत व्हिडीओ….

कुठे गेली मानवता?
महेश कनाके रेल्वेखाली गेल्यावर रेल्वे थांबली. काही जणांनी अत्यंत छोट्याशा असणाऱ्या जागेतून जखमी महेश कनकेला बाहेर काढले. पण किनवट रेल्वे स्टेशनवर स्ट्रेचर नव्हता काय? स्टेचर नसेल तरी लोकांचे सामान रेल्वे स्थानकाबाहेर नेण्यासाठी गाडे असतात. किंवा अम्ब्लुन्सला रेल्वे स्थानकात आणण्याचा मार्ग नव्हता काय असे अनेक प्रश्न त्यानंतरचा व्हिडीओ पाहुन समोर येतात. लोकांपैकी जखमी अवस्थेत असलेल्या महेश कनाकेला उचलण्यासाठी फक्त दोघांनीच हात लावला आणि त्या दोघांना महेश उचलणे अवघड झाले म्हणून त्यांनी महेशचे दोन्ही हात धरुन रेल्वे स्थानक किनवट येथे त्याला फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहुन भारतात मानवता संपली की काय असेच म्हणण्याची पाळी आली आहे.

संबंधीत व्हिडीओ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *