नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सध्या राज्यभर दौरे सुरू केले आहेत. त्यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीवर व नवीन शैक्षणिक धोरण व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम करणारे कार्यक्रम कशा पध्दतीने हाती घेता येतील याची प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला. यातच कठोर निर्णयाचे अधिकारी म्हणून राज्यात ते लोेकप्रिय ठरले आहेत. त्याच नांदेड शिक्षण विभागाचा त्यांनी पाडाच वाचून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरत दिखाऊपणाचे कार्यक्रम नकोत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम करणारे कार्यक्रम हाती घ्या असा इशाराच शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी नांदेड शिक्षण विभागाला दिला.
दि.23 रोज बुधवारी पुणे विभागाचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आढावा घेत आनागोंदी कारभारावर बोट ठेवत अधिकारी-कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले असल्याची माहिती समोर येत आहे.शिक्षण आयुक्तांच्या दौर्यामुळे अनेकांच्या झोपा उडाल्या होत्या तर पावसाळ्याच्या दिवसात अनेकांना घामही फुटला. जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला भेट दिली.या भेटीदरम्यान त्यानी शिक्षण विभागातील आनागोंदी कारभाराकडे आपले लक्ष वेधताना प्राथमिक शिक्षण विभागातील टेबल टू टेबल भेट देत कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देतांना चांगलीच खरडपट्टी केली.नांदेडच्या शिक्षण विभाग सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करण्यास कमी पडल्याचे सांगतांना दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.शिक्षण आयुक्त मांढरे यांनी माध्यमिक शिक्षण विभागात भेट देतांना आवक- जावक टेबलवर चालू कामाची माहिती जाणून घेतली.संबधीत कर्मचाऱ्यास मार्गदर्शन केले.प्राथमिक शिक्षण विभागातील वैद्यकीय प्रतिपुर्तीचे प्रलंबीत देयके,सेवा हक्क कायद्याची होत नसलेली अमलबजावणी यामुळे आयुक्त मांढरे हे संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले.शिक्षण आयुक्त मांढरे हे नांदेंड जिल्हा परिषदेत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.त्यांनी निवेदन नम्रपणे स्विकारत लवकरात लवकर निपटारा करण्याचे अश्वासन दिले.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शिक्षण विभागातील भेटीनंतर आयुक्त मांढरे यांनी पत्रकारांशी सवांद साधला यावेळी ते म्हनाले की, नांदेड जि.प.च्या शिक्षण विभागच्या कारभारात अनेक अनियमितता अढळून आल्या आहेत.सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाहीत.विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिनाम होणारे कार्यक्रम घेतले जातात का नाही हे तपासणी करण्यासाठी,जून्या केसेस संबधाने कारवाई, जाणीव पुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी मी आलो असल्याचे त्यांनी सांगीतले.तपासणीचा अहवाल लवकरच उपसंचालक यांच्याकडे पाठवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.