नांदेड(प्रतिनिधी)-7 ऑगस्ट रोजी चैनस्नेचिंग करणाऱ्या तीन गुन्हेगारांना पकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एकूण 67 हजार रुपयंाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांमध्ये एक विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.
दि.7 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 252/2023 दाखल झाला होता. यामध्ये एका महिलेचे गंठण मगनपुरा भागातून काही चोरट्यांनी स्कुटीवर चोरून नेले होते.ही महिला आपल्या वडीलांसह स्वामी समर्थ मंदिर येथे दर्शनासाठी आली होती. शिवाजीनगर गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत मेहनत घेवून शेख समद उर्फ खासीम शादुलमियॉं (20) रा.शिवनगर नुरी चौक नांदेड यास ताब्यात घेतले. त्याने सांगितल्याप्रमाणे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे दरोडा टाकलेल्या गुन्ह्यातील ऐवज असल्याची माहिती मिळाली. शिवाजीनगर पोलीसांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेवून त्याच्या पालकांसमक्ष त्याच्याकडून दरोड्यातील दोन हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणात तिसरा एक गुन्हेगारा गणेश राजाराम हिवराळे (24) रा.शिवनगर नांदेड यास ताब्यात घेतले असतांना 30 ग्रॅम सोन्याचे गंठण किंमत 30 हजार रुपये तसेच 5 ग्रॅम मिनीगंठणचा तुटलेला तुकडा 5 हजार रुपयांचा आणि गुन्हा करतांना वापरलेली स्कुटी 30 हजार रुपये किंमतीची असा 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या प्रकरणातील गणेश राजाराम हिवराळे हे सध्या पोलीस कोठडीत आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक नांदेड शहर सुरज गुरव यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रवि शंकर बामणे, शेख दुर्राणी, देवसिंग सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे, विष्णु डफडे, लिंबाजी राठोड, सायबर विभागातील पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली.
मगनपुरा येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेची बॅग चोरणाऱ्या तीन चोरट्यांना पकडून शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी