नांदेड(प्रतिनिधी)- बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन नांदेडच्या वतीने येत्या 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध मार्गदर्शक नितेश कराळे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
येथील कुसुम सभागृहामध्ये सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांच्या हस्ते होणार येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक शफकत अमना, सहाय्यक पोलीस अधीक्षक गोवर हसन, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे हे उपस्थित राहणार आहेत. याआधी बुद्धीस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी दिल्ली येथील नामवंत मार्गदर्शक केजी ग्रुपचे प्रमुख डॉ. ए. आर. खान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये नीट माहिती व्हावी व त्यांच्या अडीअडचणी संदर्भात योग्य ते मार्गदर्शन व्हावे यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने नंदकुमार बनसोडे, प्रा. सिद्धधोधन गायकवाड, दत्ताहरी धोत्रे, मिलिंद चावरे, बाबुराव कसबे, संजय नरवाडे, डॉ. राम वाघमारे, तानाजी ताटे, बाबुराव सोनकांबळे, भालचंद्र जोंधळे, रवी लोहाळे, मिलिंद व्यवहारे, भगवान गायकवाड, किशोर आटकोरे व चंद्रमणी कांबळे यांनी केले आहे.