नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दि.23 रोज बुधवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा आढावा टेबल टु टेबल घेतला यात त्यांना सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत असंख्य उणीवा आढळून आल्या. त्यांनी तात्काळ या संदर्भाचा खुलासा करण्यात यावा अशा सुचना दिल्या होत्या. याचीच गंभीर दखल घेवून शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी दोन्ही विभागातील 9 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावणी खुलासा मागितला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग नेहमी अनेक कारणाने चर्चेत राहतो. यातच राज्याच्या दौऱ्यावर असलेले शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा आढावा घेतला असता या आढाव्यात त्यांना अनेक अनियमितता असल्याचे आढळून आले. सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात उणीवा आढळून आल्याने त्यांनी शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरले होते. याच बरोबर शिक्षण विभागातील संचिका वेळेत निकाली काढण्यात आल्या नाहीत. याचबरोबर संचिकाचा निपटारा करण्याच्या तारखेत बदल करून त्यात अनियमितता केल्याचे त्यांना आढळून आले. याचबरोबर त्यांनी अनेक नोंदी व तक्रार रजिस्टरही मागून घेतले होते. मात्र त्यांना वेळेत उपलब्ध झाले नाही. एकीकडे राज्यातील 35 शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशी, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे असणाऱ्या कार्यवाह्या या संदर्भाच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला. यावरून त्यांनी राज्यात एक कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांनी नोटीसा पाठवून खुलासा मागिवला आहे. यामध्ये प्राथमिक विभागातील गोविंद रासवते वरिष्ठ सहाय्यक, अशोक नाचपल्ले कनिष्ठ सहाय्यक, राधा सर्जे, मायादेवी कांबळे, मुक्तेश्र्वर चिवडे, शिवकांता नाईकवाड कनिष्ठ लेखा अधिकारी, कांचन कुट्टे कनिष्ठ सहायक यासह माध्यमिक शिक्षण विभागातील संजीवनी तोगरमे आणि बी.आर.येलपूरवार अधिक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि तात्काळ लातूर येथे बैठकीस बोलावले आहे. हे सर्व कर्मचारी दि.24 रोज गुरूवारीच लातूर येथील बैठकीला नोटीसी हातात मिळताच तात्काळ लातूरकडे रवाना झाले. ऐरवी मात्र हेच कर्मचारी कितीही न ोटीसी आल्या तरी त्याचा खुलासा अनेक दिवसांच्या नंतर खुलासा करूत असे उत्तरे देणारे हातात नोटीसी पडताच लातूर गाठले.
जि.प.शिक्षण विभागातील 9 जणांना नोटीसा