नांदेड,(जिमाका)- शेतकऱ्यांनी किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी तसेच ‘विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती व गुलाबी बोंडअळी नियंत्रण’ या विषयावर मंगळवार 29 ऑगस्ट 2023 रोजी लोहा तालुक्यातील सातबारा (7/12) फार्मर प्रोडयुसर कंपनी, लोंढे सांगवी यांचे शेतावर फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांची उपस्थिती राहणार आहे. किटकनाशक मिश्रण तयार करणे, फवारणी करतांना वापरावयाचे सुरक्षा किटसह प्रात्यक्षिक व विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम शेतकऱ्यांना फेसबुक लाईव्हद्वारे पाहता येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.