नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने चार जणांना पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूसे पकडली आहेत. या प्रकरणातील एका आरोपीच्या भावाचा काही महिन्यांपुर्वी खून झाला होता. त्याच्याकडे पिस्तुल सापडले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वाकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले पोलीस पथक लातूरफाटा येथे पाठवले. तेथे पुजा हॉटेलसमोर मुकेश उर्फ प्रेम प्रदीप सरपे (28) रा.सिडको, माधव रामदास गायकवाड (34) रा.सुनिलनगर बळीरामपुर, किरण शिवाजी हंबर्डे(21) रा.सिडको आणि आकाश शितळे (19) रा.सिडको हे चार युवक सापडले. पोलीस पथकाने त्यांच्याकडून एक बनावटी गावठी पिस्तुल 25 हजार रुपये किंमतीचे आणि चार जिवंत काडतूसे 2400 रुपये किंमतीची जप्त केली. या युवकांनी त्यांच्याकडे असलेले पिस्तुल मध्यप्रदेशातून विकत आणल्याचे सांगितले. वृत्तलिहिपर्यत या चार जणांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार रुपेश दासरवाड, संग्राम केंद्रे, संजीव जिंकलवाड, पद्मसिंह कांबळे, गणेश धुमाळ, मारोती मोरे, धम्मा जाधव, मारोती मुंडे, सायबर सेलचे पोलीस अंमलदार राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतूसे पकडली