
नांदेड(प्रतिनिधी)-रोजच्या जीवनात खेळांना महत्व दिले तर आपल्या जीवनातील अडचणी 90 टक्के संपतात असे प्रतिपादन विभागीय रेल्वे महाप्रबंधक निती सरकार यांनी केले.
आज दि.25 रोज शुक्रवारी 34 व्या जिल्हास्तरीय पोलीस क्रिडा स्पर्धांच्या समारोप आयोजन पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी निती सरकार बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना निती सरकार म्हणाल्या, आपल्या जीवनात आणि नोकरी करणाऱ्या लोकांना अनेक समस्यांतून जावे लागते. याप्रसंगी आपण खेळाच्या माध्यमाने त्या समसयांना सोडवून तणावमुक्त राहू शकतो. सर्व जिंकेलेल्या खेळाडूंना शुभकामना देतांना त्यांनी विभागीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि देशपातळीवर यशस्वी व्हावा अशा शुभकामना दिल्या. याप्रसंगी प्रास्ताविक करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले आज आपण 34 व्या पोलीस जिल्हा क्रिडा समारोहाच्या समापन कार्यक्रमात सामील झालो आहोत. तुम्ही केलेली मेहनत आणि कमी वेळात दाखवलेले कौशल्य प्रशंसनिय आहे. पुढे येणाऱ्या परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा नांदेडला होणार आहेत. याची माहिती पण सांगितली. या क्रिडा स्पर्धेत नांदेड मुख्यालय विभाग, भोकर विभाग, नांदेड शहर विभाग आणि कंधार विभाग या चार विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात विजेत्या संघांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पुरूष आणि महिला कर्मचारी यांची 100 मिटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महिला गटातून पुरूष मुख्यालयातील शिल्पा राठोड आणि पुरूष गटातून अदानात खान उमरदराज खान भोकर विभाग यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर संगीत खुर्ची आणि लिंबु चमचा या खेळाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शेवटी सायोनारा या गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले तर आभार पोलीस उपअधिक्षक अश्र्विनी जगताप यांनी मानले.
