नांदेड(प्रतिनिधी)-सुजलेगाव ता.नायगाव येथील एका शेतकऱ्याला ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देवून 50 हजारांची खंडणी वसुल केलेल्या राजरत्न डुमणे विरुध्द रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.12 ऑगस्ट रोजी आलेल्या एका तक्रारीवरुन याच व्यक्तीविरुध्द 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नायगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे.
सुजलेगाव ता.नायगाव येथील शेतकरी बालाजी महाजन तुमवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुजलेगावातील राजरत्न सटवाजी डुमणे याने त्यांच्याविरुध्द जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व इतर अनेक कार्यालयामध्ये तक्रारी अर्ज करून ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देवून खंडणीची मागणी केली. यावेळी महाजन यांच्या तक्रारीत 50 हजार रुपये खंडणीच्या स्वरुपात घेतल्याची तक्रारीत लिहिले आहे.
बालाजी तुमवाड यांच्या तक्रारीवरुन रामतिर्थ पोलीसांनी राजरत्न सटवाजी डुमणे विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 506 नुसार गुन्हा क्रमांक 133/2023 दाखल केला आहे. रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एस.एन.नरवाडे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.
12 ऑगस्ट रोजी नायगाव पोलीस ठाण्यात आलेल्या एका तक्रारीनुसार तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांच्या जमीनीवर चढवलेला बोजा काढून देण्यासाठी राजरत्न डुमणेने 2 लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यासंदर्भाने नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 125/2023 दाखल आहे.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2023/08/22/तहसीलदारांनी-चढविलेला-बो/