देगलूर पोलीस उपविभागात स्थानिक गुन्हा शाखेच्या एएसआयने मटका जुगारावर मारली धाड

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील एएसआयने देगलूर उपविभागात मोंढा देगलूर येथे एका कल्याण जुगारावर मोठी धाड टाकली आणि तेथून 2 हजार 870 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील अत्यंत वजनदार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय विश्र्वनाथ केंद्रे यांनी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास तालुका देगलूर येथील मोंढा मैदानात सुरू असलेल्या कल्याण नावाच्या मटका जुगारावर जबरदस्त छापा टाकला. या ठिकाणी मटका जुगार खेळणाऱ्या आणि मटका जुगार खेळविणाऱ्या लोकांना पकडून त्यांच्याकडून 2870 रुपये एवढी रक्कम पकडली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या एएसआयने देगलूर पोलीस उपविभागात पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनात सुध्दा जुगार चालतो हे दाखवून दिले. संजय केंद्रे यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीसांनी मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 393/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार निरदोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *