नांदेड(प्रतिनिधी)-25 फेबु्रवारी रोजी सिडको भागातील केसरबाई प्रदीप सरपे यांचा मुलगा राजू सरपे याचा खून करणाऱ्या 9 जणांविरुध्द नांदेड शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्या स्वाक्षरीने मकोका कायद्याच्या कक्षेत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
25 फेबु्रवारी 2023 रोजी राजू प्रदीप सरपे या युवकाचा काही जणांनी वसंतराव नाईक कॉलेज सिडको समोरच्या रस्त्यावर खून केला.26 फेबु्रवारी रोजी मयत राजूची आई केसरबाई प्रदीप सरपे हिच्या तक्रारीवरुन 9 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 386, 120(ब), 143, 147, 148, 149, 323 सोबत भारतीय हत्यार कायद्या कलम 3, 4, 25, 27 सोबत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा क्रमांक 122/2023 नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला. केसरबाईने दिलेल्या तक्रारीमध्ये उकाजी उर्फ बाळा उर्फ विनोद मधुकर सावळे, गोपीनाथ बालाजी मुंगल, हर्षवर्धन सुभाष लोहकरे, राजू उर्फ चिंधी महाजन धनकवाड, कुंदन संजय लांडगे, सुमित संजय गोडबोले, विकास चंद्रकांत कांबळे, लहुजी उर्फ अवधुत गंगाधर दासरवाड आणि किरण सुरेश मोरे अशा 9 जणांची आरोपी या सदरात नावे होती. नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक राजे डाकेवार यांनी या गुन्ह्याचा प्राथमिक तपास केला.
या आरोपींनी खून करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले होते. म्हणून या टोळीविरुध्द आणि टोळीप्रमुखाविरुध्द पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यावतीने विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांच्याकडे या टोळीविरुध्द मकोका कायदा कलम 3(1)(आय)(आयआय), 3(2), 3(4) ही कलमे जोडणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. या गुन्ह्यात मकोका कायदा जोडण्याची परवानी मिळाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोेरे यांच्याकडे देण्यात आला. पुढे त्यांची बदली झाली त्यामुळे नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे हा तपास आला. या तपासात सुरज गुरव यांनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे आणि शास्त्रशुध्दपध्दतीने तपास करून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यावतीने दोषारोप पत्र पाठविण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे पाठवला. त्यानंतर सुरज गुरव यांनी प्रत्यक्ष हजर राहुन अपर पोलीस महासंचालकांसमक्ष या घटनेचे सादरीकरण करून दोषारोप पत्र पाठविण्याची परवानगी मिळवली आणि 9 आरोपीविरुध्द 1471 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
या तपासाची पुर्ण प्रक्रिया विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, त्यांचे सहकारी पोलीस उपनिरिक्षक राजेश डाकेवार, पोलीस अंमलदार शेख सत्तार, गजानन कदम, प्रभु मोरे, अंकुश लांडगे आदींनी परिश्रम घेऊन केलेल्या कामगिरीसाठी त्यांचे कौतुक होत आहे.
राज सरपेचा खून करणाऱ्या 9 जणांविरुध्द मकोका कायद्याचे 1471 पानी दोषारोपपत्र दाखल