अंदाजे 40 वर्षाचा अनोळखी मयत पुरूष माणूस सापडला; इतवारा पोलीसांचे ओळख पटविण्यासाठी आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील बाफना परिसरातील एका उघड्या नालीत अंदाजी 40 वर्षीय इमसाचा मृत्यू झाल्याची घटना दि.27 रोज रविवारी उघडकीस आली. याबाबत इतवारा पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन या घटनेचा पंचनाम केला आहे.
बाफना परिसरातील कविता टी हाऊसच्या समोर असणाऱ्या उघड्या नालीत अंदाजे 40 वर्ष वय असणाऱ्या अज्ञात व्यक्ती मृत्यूमुखी पडल्यामुळे हा अपघात आहे की, घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे. या परिसरातील व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी महापालिका प्रशासनाकडे उघड्या नालीच्या संदर्भात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. किरकोळ अपघात अनेकदा उघडले होते. मात्र मनपा प्रशासनाने याकडे वारंवार दुर्लक्षच केल आहे अखेर या नालीमध्ये अज्ञात मृत्यूमुखी पडल्याची माहिती दि.27 रोज रविवारी सकाळी उघडकीस आली. आता तरी मनपा प्रशासनाने जागे व्हावे असे तिव्र भावना या परिसरातील व्यापारी व्यक्त करीत आहेत.
अनोळखी प्रेत सापडल्याची माहिती मिळताच इतवाराचे पोलीस अधिकारी त्वरीत घटनास्थळी पोहचले. प्रथमदर्शनी असे वाटते की, हा माणुस काल रात्रीच नालीत पडला असेल आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल. त्याने चौकडी असलेला शर्ट व पॅन्ट परिधान केलेली आहे. या अनोळखी मयत माणसाबद्दल कोणास काही माहित असल्यास त्यांनी त्वरीत प्रभावाने याबाबतची माहिती पोलीस ठाणे इतवारा येथे द्यावी असे आवाहन पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड यांनी केले आहे.
पोलीस ठाणे इतवाराचा दुरध्वनी क्रमांक 02462-236510 असा आहे. तसेच पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड यांचा मोबाईल क्रमांक 9452574510 यावर सुध्दा या अनोळखी मयत माणसाबद्दल माहिती देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *