प्रेमनगर फेज-2 तरोडा या सोसायटीतील प्रकार; पाणी पुरवठा केला बंद
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायद्यातील कलम 12 प्रमाणे सोसायीटीतील एखाद्या सदस्याचे पाणी बंद करणे हा गुन्हा असतांना सुध्दा प्रेमनगर फेज-2 या सोसायटीमधील एका महिलेच्या घरातील पाणी पुरवठा बंद करून सोसायटीने केलेला गुन्हा कोठे नोंद होईल हे पाहणे महत्वाचे आहे.
प्रेमनगर फेज-2 ही सोसायटी भागिदार शकुंतलाबाई विश्र्वनाथ रेणापूरकर, भरत रेणापूरकर, किशोर रेणापूरकर या सर्वांनी मिळून बनवली. या डेव्हलपर्सचे नाव आर.के.बिल्डर्स आणि डेव्हलपर्स असे आहे. प्रेमनगर तरोडा (खु) येथे गट क्रमांक 167, क्षेत्र 29 आरमध्ये ही प्रेमनगर फेज-2 सोसायटी बनविण्यात आली आहे. याचा दस्तक्रमांक 117/2019 असा आहे. या आर.के.बिल्डर्सच्यावतीने मुख्तारआम म्हणून बलभिम रेणापुरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या सोसायटीमधील अनेक घोळ पाहता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या सर्वांविरुध्द गुन्हा क्रमांक 184/2022 दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलम 420, 465, 468, 471 आणि 34 सह नोंदणी अधिनियम कलम 82, 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा अभिजित पाटील दुय्यम निबंधक नांदेड यांच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आलेला आहे. या सोसायटीमध्ये खोटा एनए दाखविण्यात आलेला आहे. असा अर्ज दुर्गाप्रसाद राजेश्र्वरराव देशपांडे या न्यायाधीशांनी दिला आहे. या प्रेमनगर फेज-2 या सोसायटीमध्ये त्यांचा फ्लॅट क्रमंाक 101 आहे.
या सोसायटीमध्ये न्यायाधीश असलेल्या दुर्गाप्रसाद देशपांडे यांच्या पत्नी सारीका आणि त्यांची मुले राहतात. या दोघांमध्ये सुध्दा न्यायालयात विविध प्रकारचे वाद सुरू आहेत. प्रेमनगर सेसायटीचे रेणापूरकर आणि दुर्गाप्रसाद देशपांडे यांच्यामध्ये काही वाद झाले त्यामुळे जवळपास आठ दिवसांपुर्वी मेनटन्स देण्याच्या कारणावरुन सुध्दा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे वाद चालला. त्यानुसार उपनिबंधकांनी सारीका दुर्गाप्रसाद देशपांडे यांच्याकडून मेनटन्सचे पैसे घ्यावेत असे आदेश दिले. त्या आदेशानुसार सारिका देशपांडे सोसायटीच्या मेनन्टस पैसे देण्यास तयार असतांना सुध्दा त्यांचे पैसे घेतले जात नाहीत आणि पती दुर्गाप्रसाद देशपांडे यांच्यासोबत असलेल्या वादाचा बदला काढण्यासाठी सारीका देशपांडे यांच्या घराचा पाणी पुरवठा बंद करून प्रेमनगर सोसायटीचे कर्ताधर्ता सारीका देशपांडे यांना त्रास देत आहेत. सोसायटी देत असलेल्या त्रासामुळे टॅंकरने पाणी मागवून सारीका देशपांडे आपल्या रोजच्या गरजा भागवत आहेत. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायद्यातील कलम 12 प्रमाणे सोसायटीमधील एखाद्या सदस्याचा पाणी पुरवठा बंद करणे हा गुन्हा आहे. पण या गुन्ह्याची नोंद सारीका देशपांडे यांनी कोठे करावी आणि कोण त्यांना न्याय देईल या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही.
न्यायाधीशासोबत वाद आणि सोसायटी देते पत्नीला त्रास