नांदेड(प्रतिनिधी)-दहशतवाद विरोधी पथकातील न्यायालयामध्ये असणाऱ्या खटल्यांची बाजू नांदेड येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड.यादव प्रकाश तळेगावकर यांनी मांडावी असे आदेश गृहविभागातील कार्यासन अधिकारी हरेश्वर सहाणे यांनी दिले आहेत.
दहशतवाद विरोधी पथक कोर्ट कक्ष, भायखळा मुंबई येथील पोलीस निरिक्षक प्रशांत मोहिते यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त दहशतवाद विरोधी पथक औरंगाबाद यांना पत्र पाठवून नांदेड न्यायालयात सुरू असलेला दहशतवाद विरोध पथक गुन्हा क्रमांक 22/2022 मध्ये न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाची बाजू मांडण्याकरीता शिफारस केली होती. या शिफारशीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या गृहविभागातील कार्यासन अधिकारी हरेश्वर सहाणे यांनी दहशतवाद विरोध पथकाला कळविले आहे की, ऍड.यादव प्रकाश तळेगावकर हे जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत आहेत. काळाचौकी मुंबई येथे दाखल झालेला गुन्हा क्रमांक 22/2022 मध्ये नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात उद्भवणाऱ्या सर्व प्रकरणांमध्ये ऍड.यादव प्रकाश तळेगावकर यांनीच बाजु मांडावी असे निर्देशीत केले आहे.
दहशतवाद विरोधी पथकाचे न्यायालयीन कामकाज आता ऍड. यादव तळेगावकर सांभाळणार