नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात सीसीटीएनएस प्रणालीमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने आपला क्रमांक मागील अनेक महिन्यापासून मागे जाऊ दिलेला नाही. यंदाही दरमहिन्याच्या आढाव्यातील जुलै महिन्याचा प्रथम क्रमांक नांदेड जिल्हा पोलीस दलाने मिळवला आहे.
अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या देखरेखीत राज्यात सीसीटीएनएस प्रणाली कार्यान्वीत आहे. ही प्रणाली कोणत्या पध्दतीने काम करत आहे याबाबत दरमहिन्याला आढावा घेतला जातो. मागील अनेक महिन्यापासून या प्रणालीच्या कामात नांदेड जिल्हा प्रथमच येत आहे. विशेष म्हणजे या प्रणालीचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक रहिम बशीर चौधरी हे इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील प्रमुख आहेत आणि सीसीटीएनएसचे कामकाजपण करतात.
नांदेड जिल्ह्यातील 36 पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक मालमत्ता जप्ती, दोषारोपपत्र न्यायालयीन निकाल, हरवलेले व्यक्ती, अनोळखी मयत अदखल पात्र खबर गहाळ/ बेवारस मालमत्ता, प्रतिबंधक कार्यवाही अशा 18 वेगवेगळ्या माहित्या सीसीटीएनएस प्रणालीमध्ये भरायच्या असतात. सीीसीटीएनएस प्रणालीतील भरलेल्या माहितीमुळे दैनंदिन कामकाजात गुन्हे प्रतिबंध होतो, गुन्हे उघडकीस आणले जातात. तसेच आयटीएसएसओ, आयसीजेएस, सीआरआयएमएससी, सीटीजन पोर्टल, ई-कंम्पलेंट याचा वेळोवेळी प्रभावी वापर होतो. जुलै-2023 या महिन्यातील कामगिरीमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने 201 पैकी 196 गुण प्राप्त करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आज झालेल्या मासीक गुन्हे परिषदेदरम्यान पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सीसीटीएनएसचे नोडल अधिकारी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी सीसीटीएनएस पथकातील पोलीस उपनिरिक्षक रहिम बशीर चौधरी, प्रणिता बाभळे, पोलीस अंमलदार समीर खान मुनीर खान पठाण, माधव नारायण येईलवाड यांचे कौतुक करून भविष्यात सुध्दा नांदेड जिल्ह्याचा नेहमी प्रथम क्रमांक आला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जुलै महिन्यात सीसीटीएनएस प्रणालीमध्ये नांदेड जिल्हा राज्यात प्रथम