नांदेड(प्रतिनिधी)-वाजेगाव परिसरातील एका विट्टी भट्टीवर काम करणाऱ्या आई-वडील यांच्यासोबत राहणाऱ्या अल्पवयीन बालिका ही तिची बहिण त्याच परिसरातील दुसऱ्या विट्टीभर काम करत होती. तिच्या लहान मुलाचे पालन पोषण करण्यासाठी ती नेहमी जात येत असतांना इंजेगाव येथील गजानन नरबा बाऊलकर या युवकाने तिचासोबत छेट काढण्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त न्यायाधीश आर.एन.पांडे तिन महिने शिक्षा ठोठावली आहे.
यात वाजेगाव परिसरात एका विट्टभट्टीवर कामासाठी लोहा तालुक्यातील कुटूंबिय आले होते. त्याच परिसरातील वेगवेगळ्या दोन विट्टभटींवर अल्पवयीन मुलीचे आई-वडील आणि तिची बहिण असे काम करत होते. यामध्ये ती अल्पवयीन मुलगी आपल्या बहिणीच्या लहान बाळाचा सांभाळ करण्यासाठी दररोज ये-जा करत होती. यात आरोपी गजानन नरबा बाऊलकर हा मागील 8 ते 10 दिवसांपासून तिच्या पत्यावर राहुन तिची छेट काढत होता. यात दि.17 मार्च 2020 रोजी अल्पवयीन मुलीने झालेली हकीकत आई-वडील आणि बहिणीला सांगितली. यांनी त्या आरोपीला समजून सांगितले मात्र त्यांनी शेवटी न ऐकता तिला तु माझ्याबरोबर चल तुझ्याकडे माझे काम आहे, तु येतीस का की तुला उचलून गाडीवर बसू असे म्हणत होता. त्यावेळी त्या अल्पवयीन मुलीने मला तुझ्यासोबत यायचे नाही तु येथून निघून जा असे सांगितल्यानंतरही तो त्रास देत होता. त्यानंतर उशीरा आई-वडीलांसोबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन दि.17 मार्च 2020 रोजी गजानन नरबा बाऊलकर विरुध्द तक्रार दिली. पोलीसांनी याबाबतचा गुन्हा क्रमांक 149/2020 दाखल केला. यात पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात न्यायालयाने 7 साक्षीदार तपासून आरोपी गजानन नरबा बाऊलकर याला दोषी ठरवत तीन महिन्याची शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये सरकारपक्षाची बाजू ऍड. एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार फयाज सिद्दीकी आणि चंद्रकांत पांचाळ यांनी काम पाहिले.
अल्पवयीन मुलीसोबत छेड काढणे पडले महागात