
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस दलातील मागील अनेक वर्षापासून सेवाबजावली आहे. यांची दि.31 ऑगस्ट रोजी नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त होत असून त्यांना पोलीस दलाच्यावतीने यथोचित निरोप देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नांदेड पोलीस दलातील पोलीस निरिक्षक आनंत नरुटे (बिलोली), पोलीस उपनिरिक्षक नागोराव मोरे (भोकर), पोलीस उपनिरिक्षक महेबुब मोगल(इतवारा), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रमेश रामपूरवार(धर्माबाद), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वाहेद खान पठाण (अर्धापूर), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुभाष पावडे (पोलीस मुख्यालय), पोलीस अंमलदार पाशा अख्तर (शिवाजीनगर) आणि पोलीस अंमलदार मुन्तजीबुद्दीन शेख (पोलीस मुख्यालय) हे दि.31 ऑगस्ट रोजी नियत वयोमानानुसार पोलीस दलात आपली सेवाबजावून निवृत्त झाले आहेत. या सर्वांचा अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याचबरोबर अबिनाशकुमार यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता आपला वेळ पुर्ण कुटूंबाकडे देण्याचा सल्ला दिला व आपले आरोग्यही सांभाळावे अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी पोलीस उपअधिक्षक मुख्यालय अश्र्विनी जगताप, पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, पोलीस उपनिरिक्षक श्रीमती माया भोसले यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुक्मीनी कानगुले यांनी केले. यावेळी राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
