नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने गुरूद्वारा प्रबंधक हा कायदा रद्द करण्यात यावा. नांदेड स्थानिक शिख समाजावरील हा अन्याय आहे. गुरूद्वारा बोर्ड निवडणुकीच्या माध्यमातून सदस्य निवडूण येतात. यापैकीच एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष करण्यात यावे. मात्र असे न होता राज्य शासनाने नियुक्त केलाच व्यक्ती गुरूद्वारा बोर्डाचा अध्यक्ष म्हणून स्विकारला जातो. यासाठी कायदा 1956 च्या कलम 6 व 11 मध्ये बदल करून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शिख समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
गुरूद्वारा बोर्ड सचखंड श्री हजुर साहिब या ठिकाणी अध्यक्ष हा निवडणुकीतून निवडूण आलेल्या सदस्यांपैकीच असला पाहिजे. मात्र तसे न होता राज्य शासनाकडून अध्यक्ष निवडला जातो. श्री.गुरू गोंविदसिंघजी महाराज यांचे पावन पदस्पर्शाने नांदेड भुमी ओळखली जाते. गुरूद्वारा तख्त सचखंड श्री.हजुर अबचलनगर साहिब नांदेडचे व्यवस्थापन व योग्य प्रशासनाची तरतुदीचे अधिकार नांदेड शिख गुरूद्वार तख्त सचखंड श्री.हजुर अबचलनगर साहिब 1956 च्या नियमाप्रमाणे राज्य शासनाकडे देण्यात आला आहे. 1956 पासून व्यवस्थापन व प्रशासनाची जबाबदारी शासनाने नांदेड जिल्ह्यातील स्थानिक शिख समाज व्यक्तीकडे सोपविण्यात आली होती. गुरूद्वारा कायदा 1956 च्या नियम 6 (1,2,3) प्रमाणे गुरूद्वारा बोर्डचे निवडणुकीद्वारे नियुक्त नामांकित व नामनिर्देशित सदस्यांमधून निवडणुकीद्वारे अध्यक्ष निवडले जात.परंतू 2015 च्या शासनाने शिख समाज विश्र्वासात न घेता अन्यायकारक व लोकशाहीस घातक नियम 6 व 11 मध्ये संशोधन करून गुरूद्वारा बोर्ड अध्यक्ष निवडीचे अधिकार राज्य शासनाकडे देण्यात आले. हा कायदा रद्द करून पुन्हा स्थानिक शिख समाजास देण्यात यावा अशी मागणी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गुरूद्वारा बोर्ड सदस्य गुरमितसिंघ महाजन, मनप्रितसिंघ कुंजीवाले, राजेंदरसिंघ पुजारी, गुरूप्रितसिंघ सौखी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गुरूद्वारा श्री हजुर अबचल साहिबचा संशोधन कायदा रद्द करण्यात यावा-मागणी