2 लाख 60 हजार 633 रुपयांचे कर्ज घेवून परत केले नाही
नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को.ऑ.सोसायटी लि.शाखा सिडकोचे 2 लाख 60 हजार 633 रुपये परत न करणाऱ्यास तिसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजूम यांनी एक महिन्याची शिक्षा, 50 हजार रुपये रोख दंड आणि पुर्ण पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत.
सिडको भागातील एकनाथ व्यंकटराव रायपतवार यांना गोदावरी अर्बन सोसाटीने 2 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. कर्ज आणि व्याज असा एकूण 2 लाख 60 हजार 633 रुपयांचा धनादेश सन 2021 चा एकनाथ रायपतवार यांनी सोयाटीला दिला होता. तो धनादेश बॅंकेत वटला नाही. तेंव्हा सोसायटीने धनादेश ना आदर प्रकरण क्रमांक एससीसी 1528/2021 न्यायालयात सादर केले. न्यायालयात सोसायटीच्यावतीने ऍड.ए.पी.कुर्तडीकर यांनी शाखाधिकाऱ्यांची साक्ष नोंदवून घेतली. या प्रकरणातील कर्जदार एकनाथ रायतवार यांनी सुध्दा आपली साक्ष स्वत: दिली. त्यानंतर न्यायालयासमक्ष आलेला कागदोपत्री पुरावा आणि जबानी पुरावा या आधारावर एकनाथ रायपतवारला एक महिन्याची शिक्षा आणि 50 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. सोबतच त्याने दिलेल्या धनादेशावरील रक्कम 2 लाख 60 हजार 633 रुपये सुध्दा परत करायचे आहेत.