नांदेड(प्रतिनिधी)-शुक्रवार दि.1 जालना येथील मराठा आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला हा निंदनिय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यात सखोल चौकशी करून जे दोषी ाढळतील त्यांच्यावर कडक कार्यवाही केली जाणार आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिल होत. मात्र ते न्यायालयात टिकल नाही. यासाठी मागील सरकार पुर्ण दोषी असल्याचा आरोप ना.मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला संघटनमंत्री संजय कौडगे, आ.राम पाटील रातोळीकर, आ.राजेश पवार, जिल्हाध्यक्ष सुधीर भोयर, डॉ.संतुक हंबर्डे, प्रदेश सदस्य डॉ.अजित गोपछडे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.
शनिवारी नांदेड दौऱ्यावर आलेले वनमंत्री व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठा आंदोलनाबाबतीत बोलत असतांना म्हणाले की, जालना येथील झालेला प्रकार हा खेदजणक आहे. सरकार मराठा बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. या समाजाला आरक्षण मिळाव म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सखोल अभ्यास केला. यामध्ये विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, मी स्वत: यात सहभाग घेवून रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत बैठका घेतल्या आणि न्यायालयात हे आरक्षण टिकल अशा स्वरुपाच आरक्षण आम्ही मराठा समाजाला दिल होत. एवढेच नसून या आरक्षणाच्या आधारावर समाजातील युवकांना शासकीय नोकऱ्याही दिल्या होत्या. मात्र मध्यंतरी आमच सरकार कोसळल्यानंतर असणाऱ्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात त्यांनी बाजू भक्कमपणे मांडली नाही. त्यामुळेच हे आरक्षण न्यायालयात टिकल नाही. आम्ही मराठा बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. विनाकारण यामध्ये राजकारण करु नये. ज्यांनी तीन ते चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद सांभळले. विविध खाते सांभाळले अशा शरद पवारांनी विनाकारण राजकारण करुन समाजाला वेठीस धरु नये. त्यांनी समाजाच्या आरक्षणासाठी काय केल हे सांगाव असा आरोप ना.मुनगंटीवार यांनी केला.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाहांना निमंत्रण-ना.मुनगंटीवार
मराठवाडा मुक्ती संग्रामचा अमृत महोत्सव वर्ष साजर केल जात आहे. हा सोहळा औरंगाबाद येथे 16 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना एकत्रीत बोलावून हा सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पाडला जाणार आहे. यासाठी लवकरच ना.शाह यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल जाणार असल्याची माहिती ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुनगंटीवार बोलतांना म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या बाबतीत औरंगाबाद येथे व्यापक अशी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याच बरोबर 15 आणि 17 सप्टेंबर रोजी आठही जिल्ह्यात हा अमृतमहोत्सवी सोहळा पार पाडला जाणार आहे. हा 17 सप्टेेंबर पर्यंत हा महोत्सव होता तो आता 26 जानेवारी 2024 असा वाढविण्यात आला आहे. मराठवाडा विकासामध्ये इतरांच्या बरोबरीने मागे असला तरी मी वित्त मंत्री असतांना या भागाचा समतोल विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. याचबरोबर राज्य सरकारनेही या विकासासाठी मराठवाडा वॉटरग्रीट यासारख्या अनेक योजना राबवल्या आहेत. मराठवाडा विकासाचे 3 टप्पे केले आहेत. यात मध्यमकालीन विकास, दिर्घकालीन विकास अशा योजना राबवून या भागाचा विकास केला जाणार आहे. औरंगाबाद येथे मंत्री मंडळाची बैठक आयोजित केली असून या बैठकीत या भागातील शैक्षणिक, रोजगारसह अनेक बाबतीवर चर्चा केली जाणार आहे. व त्याची अंमलबजावणीही करून घेण्याच्या अनुषंगाने या बैठकीतून काम होणार आहे.उस्मानाबादी शेळी ही प्रसिध्द आहे. याबाबत संक्रीत करण्यासाठी 14 ते 15 कोटींचा प्रस्ताव, जालना येथील रेशीम संचालनालय याचबरोबर नांदेड येथील स्मार्ट सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध विकासभीमुख योजनेची अंमलबजावणी आणि त्यासाठी लागणारा निधी या बैठकीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासासाठी दिला जाणार असल्याची शक्यता ना.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे-ना.मुनगंटीवार