नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर येथील हडकोमधील रहिवाशी अशोक लक्ष्मीकांतराव कुलकर्णी (५५) यांचे काल दुपारी त्यांच्या निवासस्थानी र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
आपल्या कुटुंबियासोबत गप्पा मारत असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जागेवरच कोसळले. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत सुस्वभावी व मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्यावर काल रात्री हडको स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे सर्व नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या अकाली निधनाबद्दल हडको परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी तथा लातूर विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी यांचे ते साडू होत.