किनवट(प्रतिनिधी)- अल्पवयीन विद्यार्थीनीला वेगवेगळे प्रलोभणे दाखऊन गोकुंदा येथिल राहत्या रुमवर नेऊन तिन दिवस जबरी संभोग करणाऱ्या जितेंद्र धोंडे या वासनांध शिक्षकाविरुद्ध अगदी शिक्षकदिनाच्या पूर्वसंधेला (4 सप्टेबर 2023 रात्री 20.14 वा.) किनवट पोलीसात पोक्सोसह विविध गुन्ह्याच्या नोंदी करण्यात आल्या असून समय सूचकता लक्षात घेत पोलीसांनी त्यास अटकही केली आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल पार्डी-बोधडी खुर्द या शाळेवरील हा शिक्षक आहे. 22 ते 24 जुलै दरम्यान व त्यानंतर सुद्धा त्याने कृत्य केले. शिवाय शाळेतही अश्लीलचाळे करीत असल्याचे त्या निरागस विद्यार्थीनीने पोलीसांना दिलेल्या जबाबात इतीवृत्त सांगितले आहे.
आधार कार्ड, फोटो, पोस्टाचे खाते काढून देतो, खाजगी शिकवणीचे प्रलोभन दाखवून तिच्यावर शाळा सुरु झाल्यापासून दर शनिवार व रविवारी शिकवणीच्या बहाण्याखाली गोकुंदा येथे विद्यार्थीनीला आणून तीन दिवस जबरदस्तीने अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलीस निरीक्षक दीपक बोरशेंच्या आदेशावरुन स.पो.नि.वाठोरेंनी गुन्ह्याची नोंद करुन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मलघणे यांच्याकडे प्रकरण वर्ग केल्याचे समजते. गु.र.नं.216/2023, कलम 376 (अ ब),(ई),(2),(फ), 376 (आय)(न), 354,223,506 भादंवी व सहकलम 4,6,8,12 पोक्सो व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्ह्याच्या नोंदी केल्या आहेत. जिल्हा परिषद हायस्कूल पार्डी-बोधडी खुर्द या शाळेच्या उज्वल भविष्यासाठी बोधडी खुर्द, पार्डी खुर्द, येंदा-पेंदा, भूलजा, कोपरा अशा विविध गावातील पुर्वजांनी, जेष्ठांनी अथक परिश्रम घेतले होते. म्हणून या शाळेचे पावित्र्य भंगले नव्हते. आज या वासनांधमास्तराच्या वेदनादायी घटनेने त्यावर पाणी फेरल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा शिक्षक शिक्षक दिनी गजाआड