नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील काही भागात कुपोषणाच्या बाबतीत अनेक तक्रारी आहेत.कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न केले जाणार असून यामध्ये महिलेच्या आरोग्याचा स्तर सध्या घसरला आहे. हा उंचावण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी आगामी काळात व्यापक अशी मोहिम राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व्हीस बुक नोंदी याचबरोबर कामकाजातील शिस्त लागण्यासाठी गुगल ऍप तयार केल जाणार आहे. हे काम किनवट येथील एका संस्थेला दिल आहे. पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक पध्दतीने घेतली जाणार आहे आणि याचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत ठेवण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर यासाठी विशेष वेळही त्या बायोमॅट्रीक ठरवून दिला जाणार आहे. त्यानंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी पडणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनाही शिस्त लागेल. याचबरोबर जिल्हा परिषदेत येणाऱ्या विविध विभागामार्फत अनेक संचिका कागदपत्रांच्या त्रुटीमुळे पडून राहतात. यासाठीही विशेष ऍप तयार करून सर्व संचिका एकाच ऍपमध्ये समाविष्ट केल्या जातील आणि त्या संचिका केवळ दोन वेळाच हाताळल्या जातील. तिसऱ्यांदा ही संचिका बाद करण्यात येईल. यामुळे कामाचा निपटाराही होणार आहे.
ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी वेध भविष्याचा हे उपक्रम राबविले जाणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष असे काही तरी काम हाती घेतले जाणार असून या शेतकरी गट आणि व्यापारी यांना जोडून शेतकऱ्यांना आपला माल थेट व्यापाऱ्यांना विकण्यासाठी हे उपयोगी पडणार आहे. याचबरोबर दर महिन्याच्या 13 तारेखेला प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण आयोजित केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख त्या दिवशी उपस्थित राहून ग्रामीण भागातील नागरीकांच्या समस्या त्याच ठिकाणी सोडविल्या जाणार असल्याचा प्रयत्न 13 सप्टेंबर रोजी भोकर येथून सुरू केला जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिली आहे.
कृषी आणि आरोग्य यावर आगामी काळात व्यापक काम केल जाणार-सीईओ मिनल करणवाल