अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला मदत करणाऱ्या त्या शिक्षकाचाही शोध घ्यावा

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला शिक्षक दिनापासून विशेष पोक्सो न्यायालयाने 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पिडीत बालिका या शिक्षकाच्या घरी कोठून आली. त्या भागापासून ते अन्याय करणाऱ्या शिक्षकाच्या घरापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी होत आहे. कारण पिडीत बालिकेला अत्याचारी शिक्षकाच्या घरी आणून सोडणारा सुध्दा शिक्षकच आहे अशी माहिती स्थानिक लोक सांगत आहेत. त्या नराधमाने तर अत्याचार करणाऱ्या शिक्षक जितेंद्र धोंडेने केलेल्या अश्लिल कृत्याचा व्हिडीओ बनवला. मग तो या गुन्ह्यात आरोपी का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एका अल्पवयीन बालिकेला प्रलोभन दाखवून तिच्या बहिणीच्या घरून एक शिक्षक आपल्या दुचाकीवर घेवून गेला. त्याने त्या अल्पवयीन बालिकेला जितेंद्र धोंडे या शिक्षकाच्या घरी सोडले. हा प्रकार 4 सप्टेंबर 2023 च्या रात्री 8 वाजेदरम्यानचा आहे. अत्याचार करणारा शिक्षक जिल्हा परिषद हायस्कुल पार्डी-बोधडी या शाळेवर शिक्षक आहे. हा शिक्षक या बालिकेसोबत नेहमी शाळेत सुध्दा अश्लिल चाळे करत असे. घटनेची माहिती मिळताच किनवटचे पोलीस निरिक्षक दिपक बोरसे, सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे यांनी त्वरीत प्रभावाने गुन्हेगार शिक्षक जितेंद्र धोंडेला ताब्यात घेतले.
आधार कार्ड काढून देतो, पोस्टाचे खाते काढून देतो, खाजगी शिकवणीचे प्रलोभन दाखवून या अत्याचारीत बालिकेवर हा शिक्षक नेहमीच अत्याचार करत होता. शिक्षक दिनाच्या दिवशी 5 सप्टेंबरपासून विशेष पोक्सो न्यायालयाने जितेंद्र धोंडेला 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. आजपर्यंत या शिक्षकाने अनेक अत्याचार केल्याची माहिती लोक सांगत आहेत.
आज प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार या अत्याचारीत बालिकेला गोकुंदा ते वासनांध शिक्षक जितेंद्र धोंडे याच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपसाले तर या बालिकेला घेवून जाणारा व्यक्ती कोण आहे हे कळेल असे स्थानिक लोक सांगतात. तसेच त्या बालिकेला घेवून जाणारा शिक्षक येथीलच एका आदिवासी संशोधन केंद्रात शिक्षक असलेल्याचे माहितीगार सांगत आहे. बालिकेला घेवून जाणाऱ्या शिक्षकानेच तिचे व्हिडीओ चित्रीकरण केले असेही स्थानिक लोक सांगत आहेत. त्या व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले पाहिजे, ती व्हिडीओ क्लिप जप्त केली पाहिजे. तरच समाजात अन्याय माजविणाऱ्या लोकांवर जरब येईल. ज्या शिक्षकांवर भारताचे भविष्य तयार करण्याची जबाबदारी असते त्यांनी अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करावे यापेक्षा प्रगल्भ असलेल्या भारतीय लोकशाहीचे दुर्देव तरी काय?.

आपली शासकीय नोकरी सोडून नेता झालेल्या अत्यंत विद्वान वकिलाने बालिकेवर अन्याय करणाऱ्या शिक्षकाला मदत करण्याचा वसा घेऊन आपले नाव अत्यंत खालच्या पातळीवर आणण्याची सुरुवात केली आहे.

संबंधित बातमी….

https://vastavnewslive.com/2023/09/05/अल्पवयीन-मुलीवर-अत्याचार/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *