नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात काही पोलीस निरिक्षकांना नवीन तात्पुरत्या बदल्या दिल्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत.नजिकच्या काळात निवडणुक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पुन्हा बदल्या करायच्याच आहेत म्हणून तात्पुरर्त्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात रिक्त झालेल्या बिलोली पोलीस ठाण्यात गणेश सोंडारे यांना पाठविण्यात आले आहे. नायगाव येथे कार्यरत जिल्ह्यातील सर्वात दमदार पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांना लोहा येथे पाठविले आहे. आर्थिक गुन्हा शाखेचे उदय खंडेराय यांना कंधार येथे पाठविण्यात आले आहे. नायगाव येथे सौ.वसुंधरा बोरगावकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. मुदखेड येथे नामदेव रिठे यांना पाठविण्यात आले आहे. शहर वाहतुक विभागात सुभाष बारकड यांना नियुक्ती देण्यात आली आहे. म्हणजे जुने पोलीस निरिक्षक संजय ननवरे यांना बदलीच्या नवीन जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील काही पोलीस निरिक्षकांना तात्पुरत्या नवीन नियुक्त्या