नांदेड(प्रतिनिधी)-भारत निवडणुक आयोगाच्या आचार संहितेनुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागतात. पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी 15 ऑक्टोबपर्यंतची तारेखी देवून पोलीस महासंचालक कार्यालयातील अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी त्वरीत प्रभावाने संपूर्ण माहिती पोलीस महासंचालक कार्यालयात पाठविण्यास आदेशीत केले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक वेळेस राज्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यातून निवडणुकीवर त्यंाच्या नियुक्तीचा प्रभाव पडू नये ही सर्वात मोठी भावना या भावनेला अनुसरून काही तरतूदी तयार केल्या जातात आणि त्या तरतुदीमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलण्यात येत असते.
यंदा 4 नोव्हेंबर रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार सर्व माहिती जमा करून पोलीस घटक प्रमुखांनी ती माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाला 15 ऑक्टोबरपर्यंत पाठवायची आहे. यानुसार मुळ जिल्ह्यात नियुक्तीस असलेल्या अधिकाऱ्यांची यादी. एकाच जिल्ह्यात मागील 4 वर्षात 16 जुन 2024 पर्यंत तीन वर्ष खंडीत, अ खंडीत कालावधी पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची यादी. घटकात सध्या हजर असलेले अधिकारी जे पपत्र अ व ब मध्ये नाहीत मात्र ते ज्या ठिकाणी (लोकसभा मतदार संघ) कार्यरत आहेत. त्या लोकसभा मतदार संघात जिल्ह्यात सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हजर होते अशा अधिकाऱ्यांची यादी.फौजदारी गुन्हा न्याय प्रविष्ठ आहे काय अशा अधिकाऱ्यांची यादी. ही सर्व माहिती ई-ऑफीस प्रणालीमार्फत पाठवायची आहे.
पोलीस महासंचालकांना महाराष्ट्र राज्यच्या गृहविभागातील अव्वर सचिव स्वप्नील गोपाल बोरसे यांनी पाठविलेल्या पत्रानुसार 14 ऑक्टोबर 2023 पासून संबंधीत निवडणुक अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे आवश्यक आहे. पोलीस निरिक्षक, उपनिरिक्षक आणि त्या वरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना या बद्दल्या लागू आहेत. आचार संहितेच्या कलम 19 मधील सर्व सुचनांचे पालन करून या बदल्या लवकरात लवकर तयार करून नवीन नियुक्त्या द्याव्यात असे या आदेशात म्हटले आहे.
या आदेशाने आता बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांची चिंता सुरू झाली असेल. आपला नंबर या यादीत लागू नये यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या तयार केल्या जातील. नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे मात्र कोणत्या क्लुप्त्यांना आधार देतील आणि कोणत्यांना ढकलून देतील हे यादी पुर्णपणे तयार झाल्यावर दिसणार आहे. एक नक्की या बदल्यांच्या यादीमध्ये आपले नाव येवू नये यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले असतील.
निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार बदल्यास पात्र अधिकाऱ्यांची यादी 15 ऑक्टोबरपर्यंत तयार करा