मंटोच्या शब्दातील वेश्येपेक्षा कमी दर्जा असले पत्रकार पुन्हा एकदा दिसले

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील हॉटेल आयकॉन येथे चालणारा शारीरिक खेळ काल शिवाजीनगर पोलीसांनी उघडकीस आणला. हा खेळ उघडकीस आणला तेंव्हा पोलीसांच्या कामकाजावर जनतेने टाळ्या वाजविल्या. पण काही मंटोच्या भाषेतील पत्रकारांनी स्वत:ची विक्री करून त्या महिलांपेक्षा आपली पत खाली पाडून घेतली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल आयकॉनमध्ये काही शारिरीक खेळ चालतो अशी माहिती होती. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले, त्यांचे सहकारी पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि इतर पोलीस अंमलदारांनी त्यांच्याकडे आलेल्या माहितीला जोड दिली आणि दिलेली जोड मजबूत झाल्यावर काल सायंकाळी 5 वाजता पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि इतर काही पोलीस अंमलदारांनी या हॉटेलमध्ये प्रवेश केला. हे हॉटेल पोलीस ठाण्यापासून जवळच आहे. या हॉटेलच्या आसपास नक्की बार आहे. घरे आहेत. त्यामुळे या हॉटेलमध्ये शिरलेले पोलीसांकडे जनतेचे लक्ष गेले. काही वेळातच पोलीसांनी त्या हॉटेलमधून 5-6 युवकांना बाहेर आणले. तेंव्हा रस्त्यावर उभ्या राहिलेल्या लोकांनी पोलीसांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. पुढे या युवकांविरुध्द योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. जनतेचे पोलीसांच्या कामावर वाजविल्या टाळ्या ह्या महत्वपूर्ण आहेत. या युवकांनी त्या ठिकाणी सुरू ठेवलेले शारिरीक खेळ करण्याचे त्यांचे वय नाही. त्या अगोदर आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या पुर्ण करणे आवश्यक होते हे विसरून त्यांनी सुरू ठेवलेला हा शारीरिक खेळ पोलीसांनी झटका दिल्या आणि त्या झटक्यासाठीच जनतेच्या पोलीसांसाठी टाळ्या होत्या.
50 च्या दशकातील पत्रकार, विचारवंत, लेखक, सआदत हसन मंटो म्हणतात एक कोठे की एक तवायफ और एक बिका हुआ पत्रकार एक ही श्रेणी में आते है। लेकीन इनमें तवायफ की इज्जत ज्यादा होती है । असाच प्रकार याही प्रकरणात घडला. काही दोन-चार भिकारड्या पत्रकारांनी या बातम्या आम्ही छापून येवू देणार नाही असे सांगत पैसे जमा केले. पैसे जमा केल्याची माहिती इतर पत्रकारांना प्राप्त झाली मग त्या पत्रकारांना आपली विक्री कोणी तरी इतराने केली याचा राग आला आणि मग सर्वांनीच ह्या बातमींना जास्त प्रसिध्दी दिली. अशा प्रकारे इतरांची विक्री करण्याचा प्रकार काही विविध विभागांमध्ये सुरू आहे. तसाच पत्रकारांमध्ये सुध्दा सुरू आहे. याला कोठे तरी सर्व पत्रकारांनी एकत्र मिळून जरब बसविण्याची गरज आहे. आम्ही आज पत्रकारांविरुध्द लिहित आहोत. आमचे सुध्दा वाईट गुण शोधा आणि लिहा असे आव्हान सुध्दा आम्ही या माध्यमातून करीत आहोत.

संबंधित व्हिडिओ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *