नांदेड(प्रतिनिधी)-आद्य क्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालयात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात सर्वांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
7 सप्टेंबर हा दिवस आद्य क्रांतीविर राजे उमाजी नाईक यांचा जन्मदिन. आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील इतर विभागाचे सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, विनोद भंडारे आदींनी उत्तमरित्या केले.
आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांना पोलीस अधिक्षक कार्यालयात अभिवादन