नांदेड(प्रतिनिधी)-लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव कोरका येथे बचत गटाची वसुली करून जाणाऱ्या एका व्यक्तीला खाली पाडून त्याच्याकडून 73 हजार 260 रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार 5 सप्टेंबरच्या सकाळी 11 ते 11.30 यावेळेत घडला आहे.
माधव कामाजी दुडे (20) हे रा.चिकना ता.धर्माबाद जि.नांदेड येथील आहेत. ते 5 सप्टेंबर रोजी पिंपळगाव येथे फायनान्स वसुली करण्यासाठी गेले होते. वसुली झालेले पैसे बॅगमध्ये ठेवून आपल्या दुचाकीवरून परत निघाल्यानंतर कोरका शिवारात त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर दोन जण आले. पाठीमागच्या बाजूने त्यांच्या दुचाकीला जोरदार धक्का मारल्याने ते खाली पडले. त्यानंतर या दरोडेखोरांनी त्यांना धक्का मारून चाकुचा धाक दाखवून 69 हजार 260 रुपये रोख रक्कम आणि 4 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा ऐवज लुटून नेला आहे. लिंबगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक केजगिर अधिक तपास करीत आहेत.
पिंपळगाव कोरका शिवारात 73 हजारांची लुट