गॅसच्या किंमती कमी करणे म्हणजे निवळ धुळफेक
नांदेड(प्रतिनिधी)-देशातील सर्व सामान्य नागरीक महागाई आणि बेरोजगारीने परेशान आहेत. एकीकडे भरमसाठ महागाई करायची आणि दुसरीकडे थोड्याफार प्रमाणात ती कमी करून दाखवायची हा केंद्र सरकारचा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरीकांच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.जितेश अंतापुरकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, माजी अविनाश घाटे, जिल्हा कॉंगे्रस अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, मुन्तजिबोद्दीन यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी अशोक चव्हाण बोलतांना म्हणाले की, देशात महागाई ही सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचणारी आहे. याचबरोबर कॉंगे्रसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आज एक वर्ष पुर्ण होत असल्याने या यात्रेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.प्राथिनिधीक स्वरुपात महात्मा फुले पुतळा ते कुसूम सभागृहापर्यंत पदयात्रा काढून कुसूम सभागृह येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर महागाईच्या बाबतीत केंद्र सरकारने मागील 9 वषाच्या काळात उच्चांक गाठला आहे. 2014 मध्ये 400 रुपयांचा गॅस आज 1200 रुपयांना मिळतो यातही त्यांनी 200 रुपये कपात केले. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा केलेला प्रकार म्हणजे सर्वसामान्यांच्या नजरेत धुळफेक केला असल्याचे त्यांनी व्यक्त केले. याचबरोबर 2014 आणि 2023 या कालावधीत वाढलेली महागाई याचा रितसर आढावा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला.
2014 मध्ये भाजपने बहुत हुई महेंगाई हा नारा देवून सत्तेवर आले आता त्यांनाच विचारायची वेळ आली आहे. एकीकडे सर्वच बाबीत महागाई झाली असतांना शेतकऱ्यांच्या मालाला मात्र वाढीव भाव मिळत नाही किंवा याचा फायदाही त्यांना होत नाही. एकीकडे महागाई वाढत आहे तर दुसरीकडे नोकऱ्या जात आहेत. आज देशात 8.11 टक्के बेरोजगारीचे प्रमाण झाले आहे. आतापर्यंत 1 कोटी 16 लाख रोजगार कमी झाले आहेत. दुध, दही व कृषी मालावर केंद्र शासनाने जीएसटी लावले आहे ही मात्र दुर्देवी बाब आहे असा आरोपी अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे ही भुमिका आमची सुरूवातीपासूनचीच आहे. मुंबईत बैठका घेवून काही होणार नाही यासाठी घटनेत बदल करावा लागणार आहे. या उपसमितीचा अध्यक्ष होतो. तेंव्हा राज्यातील सर्व खासदारांना घटना दुरूस्ती संदर्भात पत्र पाठविले होते. यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे ही आमची भुमिका सुरूवातीपासूनच आहे आणि ती आजही आहे.
मराठवाडा अमृत महोत्सव वर्ष साजर होत असतांना या शासनाने आजपर्यंत एकही कार्यक्रम घेतला नाही. मराठवाडा हा महाराष्ट्रात सामील होतांना बिनशर्त सामील झाला. मात्र आजही मराठवाड्याच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात काम करण्याची गरज आहे. ते होत नाही शेवटी जाता-जाता तरी या शासनाना जाग आली असेच म्हणावे लागेल. आजही नांदेडचे अनेक प्रश्न तसेच आहेत. यात नांदेड येथे कॅन्सर रुग्णालय, कृषी महाविद्यालय, रेल्वेचे प्रश्न या संदर्भात समृध्दी महामार्ग असे अनेक प्रश्न आहेत. याबाबत मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांच्याकडे अनेकदा मागणी या संदर्भात केली आहे.
पत्रकार विजय जोशी यांचा सत्कार

मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष तथा विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विजय जोशी यांचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुष्पगुच्छ सत्कार केला. यावेळी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.जितेश अंतापुरकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, माजी अविनाश घाटे, जिल्हा कॉंगे्रस अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, मुन्तजिबोद्दीन यांची उपस्थिती होती.