अहमदपूर (प्रतिनिधी)- दिनांक ३० सप्टेंबर ते ३ आक्टोबर २०२३ दरम्यान लातूर येथे होणाऱ्या ८ व्या महाराष्ट्रा स्टेट ज्युनिअर सॉफ्ट टेनिस चॕम्पियनशीप (मुले व मुली) यासाठी लातूर जिल्हा संघ निवड चाचणी व स्पर्धा यांचे सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता किलबील नॕशनल स्कुल अहमदपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील ज्या खेळाडूंचा जन्म ०२/०१/२००५ रोजीचा किंवा त्यानंतरचा असेल अश्या सर्व मुले व मुली खेळाडूंनी आपला जन्मदाखला,आधारकार्ड, बोनाफाईड सह स्पर्धा व निवड चाचणी साठी हजर रहावेत असे आवाहन जिल्हा अध्यक्ष माजी राज्यमंत्री व आमदार श्री विनायकराव पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष(भाजपा) श्री गणेशदादा हाके, श्री ज्ञानोबा भोसले, सचिव पोलीस उ निरीक्षक असद शेख, अभिजीत बी.एल., तबरेज लाला, अय्युब जहागीरदार, चेतन मुंढे, सुनिल शिंदे, विकास जायभाये व फैजान शेख यांनी केले आहे.