नांदेड(प्रतिनिधी)-अमराबाद येथे राहणाऱ्या पांचाळ कुटूंबियांवर गेल्या एकावर्षापुर्वीपासून सुरू असलेल्या अन्यायाचा शेवट आजही झालेला नाही. आज पांडूरंग विठ्ठल पांचाळ यांनी पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिलेल्या निवेदनानुसार पोलीस स्टेशन अर्धापूर येथील पोलीस तपासीक अंमलदार नागतिलक आणि पोलीस निरिक्षक हनमंत गायकवाड हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. या लोकांच्या सर्व जमीनी, घरे, आरोपींनी नष्ट केली आहेत.
दि.28 नोव्हंेंबर 2022 रोजी गावातील सार्वजनिक डी.पी.जळाल्यानंतर त्या वादातून टेकाळे आणि कदम कुटूंबियांतील सदस्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्याबाबत अर्धापूर पोलीस ठाण्यात आमच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 321/2022 दाखल झाला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलम 307 सह अनेक कलमे जोडण्यात आली. त्यामुळे पांचाळ कुटूंबियांना तुरूंगात जावे लागले. त्यामध्ये एक 77 वर्षांचे व्यक्ती सुध्दा अद्याप अटकपुर्व जामीन मिळविण्याच्या तयारीत आहेत. पांचाळ कुटूंबियांतर्फे देण्यात आलेल्या तक्रारीत फक्त 324 भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्यांना पोलीसांनी पोलीस ठाण्यातच नोटीस दिली. परंतू पांचाळ कुटूंबिय जेलमध्ये राहिल्यानंतर टेकाळे आणि कदम कुटूंबियांनी त्यांच्या संपुर्ण शेतीचे नुकसान केले. शेतीच्या पाईपलाईन तोडून टाकल्या. घरातील सर्व साहित्य चोरून नेले. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे परिक्षेसाठी लागणारे कागदपत्र सुध्दा गायब करण्यात आले. पोलीसांनी त्या लोकांना जामीन दिला यावर पांचाळ कुटूंबियांचा आक्षेप नाही. पण आमचे साहित्य कोठे आहेत असा प्रश्न त्यांनी आज पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात सुध्दा विचारला आहे आणि वास्तव न्युज लाईव्हशी बोलतांना पण सांगितले आहे. पांडूरंग पांचाळ सांगत होते. की, आम्हाला जेंव्हा मारहाण होती तेंव्हा आमचा बचाव पोलीसांनीच केला आणि तरी सुध्दा भारतीय दंड संहितेच्या कलम 307 सारखा गंभीर गुन्हा आमच्या विरुध्द दाखल केला. पांडूरंग पांचाळ सांगत होते की, आमचे काही चुकले असेल आम्ही कायद्याविरुध्द वागलो असेल त्याची शिक्षा आम्हाला व्हावी पण टेकाळे आणि कदम कुटूंबियांना मिळणाऱ्या सवलतींबाबत आम्ही नक्कीच दु:खी आहोत.
आमराबाद येथील एक वर्षापुर्वीच्या भांडणात विरुध्द गटाने पांचाळ कुटूंबियांची शेती, घरे, कागदपत्रे आणि संपत्तीचे नुकसान केले