नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या सासरवाडीत मला राहु न देण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरिक्षक माझ्या नवऱ्याला भडकावतात अशा आशयाचे निवेदन आज एका विवाहितेने पोलीस अधिक्षकांना भेटून दिले.
या विवाहितेचे लग्न सागर ओमकांत स्वामी सोबत 25 एप्रिल 2022 रोजी झाले होते.लग्नानंतर माझे पती व माझ्या सासरची मंडळी मला त्रास होती. कित्येक वेळेला प्रतिष्ठीत मंडळींना बसवून मला नांदवायला घेवून जाण्याबद्दल चर्चा झाली. तरी पण काही घडले नाही.त्यामुळे प्रि-लिटीगेशन पिटीशन न्यायालयात सादर केले. त्यावेळी माझे पती, सासु, सासरा, व ननंद न्यायालय परिसरात तडजोडीसाठी आले. त्यावेळी माझी ननंद जिचे पती नांदेड जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. तिने माझ्या अंगावर धावून येत सांगितले की, माझा नवरा पोलीस आहे तो सर्व काही बघून घेईल. तुझ्यावरच खोटी कार्यवाही करून तुला जेलमध्ये टाकील. अशा धमक्या दिल्या.
माझ्या ननंदेचा नवरा हा नांदेड जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरिक्षक आहे त्याच्या जोरावरच माझ्या संसाराला धोका आहे. माझे किंवा माझ्या वडीलांचे काही बरेवाईट झाल्यास त्यासाठी माझी ननंद, तिचा सहाय्यक पोलीस निरिक्षक नवरा हे जबाबदार राहतील असे या निवेदनात लिहिलेले आहे.
नांदेडच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकामुळे माझा संसार विस्कळला; महिलेचा आरोप