नांदेड(प्रतिनिधी)-जालना येथील अंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी तहसील कार्यालय लोहा अंतर्गत येणाऱ्या पळसी गावातील जनतेने एक दिवस आंदोलन करून मौजे अंतरवाली सराटी येथील आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे.
दि.11 सप्टेंबर रोजी ग्राम पंचायत कार्यालय पळसी येथील सरपंच राजश्री गोटमुकले, उपसरपंच नामदेव कोल्हे यांच्या लेटरपॅडवर दिलेल्या निवेदनानुसार मौजे अंतरवाली सराटी येथील मनोज पाटील जरांगे हे मागील 14 दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण करत आहेत. त्यासाठी मौजे पळसी ता. लोहा येथील ग्रामस्थांनी हनुमान मंदिर मैदान पळसी येथे एक दिवशीय उपोषण करून त्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. या निवेदनावर सकल मराठा समाज लिहिलेले आहे. तसेच नामदेव शिवाजी कोल्हे, सुदाम आप्पाराव शिंदे, प्रकाश संतोबा चितळकर, आनंदा मधुकर वरळे, माणिका तुकाराम कोल्हे, ज्ञानोबा सदाशिव कोल्हे, जगदीश रामराव वरळे, श्रीकांत सखाराम शिंदे, नव्हानंद बालाजी चिंतळकर, मोतीराम बालाजीराव शिंदे, सोपान भगवानराव शिंदे, सोपानराव भाऊराव वरळे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
पळसी ता.लोहा येथे मराठा आरक्षणास पाठींबा