नांदेड पोलीस दलात दुसरा एक लोखंडी पुरूष सापडला; मध्यरात्री एका कुटूंबाला एलसीबीचा म्हणून बंदुक दाखवून दिली धमकी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस दलात एकच लोखंडी पुरूष होता आता दुसऱ्या एका लोखंडी पुरूषाचा शोध लागला आहे. त्या लोखंडी पुरूषाने काल रात्री मी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार आहे म्हणून एका कुटूंबाला बंदुक दाखवली. परंतू कुटूंबाने हिम्मत दाखवत त्याची बंदुक आपल्या ताब्यात घेतली. काही जण असे सांगतात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे. परंतू कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. आता यत्र योगेश्र्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:। तत्र श्रीर्विजयो भुतिधुर्‌रवा नीतिर्मतिर्मम।। असे म्हणावे लागेल त्या कुटूंबाला कारण योगेश्र्वर हा श्रीकृष्ण आहे आणि तेथे विजय निश्चित आहे असे म्हटले जाते.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुटूंब राहते. आई-वडील, एक मुलगी आणि एक मुलगा असे हे कुटूंब आहे. काल रात्री 12 वाजेच्यासुमारास विमानतळ पोलीस ठाण्यात असलेले एक लोखंडी पुरूष पोलीस अंमलदार बंडू केशवराव कलंदर पाटील बकल नंबर 1218 हे त्या कुटूंबाच्या घरी गेले. खिडकी वाजवून बळजबरीने खिडकी उघडायला लावली आणि मी एलसीबीचा पोलीस आहे असे सांगत आपल्याकडील बंदुक दाखवली. त्या कुटूंबाने हिम्मत दाखवत या लोखंडी पुरूषाची बंदुक ओढून घेतली आणि पोलीस ठाणे विमानतळ गाठले. शेवटी पोलीस -पोलीसच. लोखंडी पुरूष असला तरी काही दिवसांपुर्वीच त्याला उत्कृष्ट पोलीस अंमलदार म्हणून बक्षीस मिळाले होते. काही लोक असे सांगतात बक्षीस मिळालेले काम कोणी दुसऱ्यानेच केले. पण बक्षीस मिळविण्यात या लोखंडी पुरूषाला यश आले.
पोलीसांनी त्या पिडीत कुटूंबाकडून गोळ्या काढून घेतोत म्हणून लोखंडी पुरूषाची बंदुक घेवून टाकली आणि नंतर त्यांना बंदुक सुध्दा परत दिली नाही. विमानतळ पोलीस ठाण्यातील अभिलेख असे सांगत आहे की, या लोखंडी पुरूष पोलीस अंमलदाराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पण ती दारु पिण्यासाठी झाली असेल. लोखंडी पुरूष या संदर्भाने त्याची तपासणी होणे आवश्यक आहे. काही जण सांगतात हा आजचा पहिलाच प्रकार नव्हे तर असे अनेक प्रकार या लोखंडी पोलीस अंमलदाराने पुर्वी सुध्दा घडवलेेले आहेत. आता त्या कुटूंबाकडे यत्र योगेश्र्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:। तत्र श्रीर्विजयो भुतिधुर्‌रवा नीतिर्मतिर्मम।। असे करण्याशिवाय काही पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. योगेश्र्वर अर्थात तो श्रीकृष्ण आहे तो नक्कीच या प्रकरणाला न्याय देईल, दिशा दाखवेल. तो ज्याच्यासाठी लढेल तो निश्चित विजयी होईल असा या संंस्कृत शब्दांचा अर्थ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *