वकीलांनी न्यायालय परिसरात मारहाण केल्याने वकील व्यवसायाची नोबेलिटी हरवली

नांदेड(प्रतिनिधी)-जगात नोबल प्रोफेशन या नावाने ओळखला जाणारा फक्त एकच व्यवसाय आहे आणि तो म्हणजे वकीली परंतू आज नोबेलीटी विसरुन दोन वकीलांनी न्यायालयात फिल्मी स्टाईल मारहाण करून ती नोबेलिटी संपवली आहे. इतरांचे वाद सोडविण्याची जबाबदारी असणारे वकील असे करतील तर समाज त्यांच्याकडे कसा पाहिल.
आज दुपारी 4 वाजेच्या आसपास वकील मंडळी बसतात त्या क्रमांकाच्या खोलीच्या वरांड्यात दोन युवक वकीलांनी एक दुसऱ्याला मारहाण केली. मारहाण होत असतांना त्या ठिकाणी बरेच वकील हजर होते. त्यात त्यांचे गुरू सुध्दा होते. पण कोणीच वकीलांनी भांडण का करताय असा प्रश्न त्यांना विचारला नाही. वकीलांच्या या भांडणामध्ये न्यायालयाच्या दाराची काचेची तावदाने मात्र बळी गेली. आज घडलेला हा प्रकार म्हणजे काही तरी आपसात वाद झाला असेल. वाद सोडविण्यासाठीच तर ही मंडळी वकील बनली आहेत. आणि जगात नोबल नाव लागते असाच एकच वकीली व्यवसाय आहे. मग वकीलांनी एक दुसऱ्याशी मारहाण केली असेल तर ती व्यवसायातील नोबेलीटी कोठे हरवली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मारहाणीचे कारण काय? आणि एवढ्या मोठ्या कारणासाठी ती मारामारी न्यायालयाच्या परिसरातच होणे आवश्यक होते काय? असा प्रश्न विचारला जात आहे. झालेला प्रकार नक्कीच दुर्देवी आहे. दोन्ही वकील बंधूंनी आपसात सायंकाळच्यानंतर भेटून आपली आपसातील वैर भावना संपवावी असे न्यायालय परिसरात बोलले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *