नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस कायदा पोलीसांना जो अधिकार देतो त्यानुसार सध्याच्या दिवसांमध्ये सुरू असलेल्या सणांमध्ये काही विघ्न येवू नये म्हणून जवळपास 14 जणांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हद्दपार केले आहे. या हद्दपारीत कोणाची मुदत दोन वर्ष आहे, कोणाची एक वर्ष आहे तर कोणाची मुदत सहा महिने आहे.
सध्या श्रावण आणि मार्गशिष महिन्यात अनेक सण असतात. या सणांच्या पार्श्र्वभूमीवर सामाजिक शांततेला बाधा येवू नये म्हणून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी देगलूर येथील गुन्हा क्रमांक 1/2022 मधील आकाश विठ्ठलराव देशमुख (32),सुगतकुमार रमेशराव केरुरकर(29) यांना 28 जून 2023 पासून दोन वर्षाकरीता नांदेड जिल्ह्यातून हद्द पार केले आहे. तसेच मुदखेड येथील गुन्हा क्रमांक 1/2023 मधील चेतन्य उर्फ अनिल सटवाजी चुडेवार(21), नितीन सटवाजी चुडेवार(29), कृष्णा उर्फ नाथा बालाजी बहिरवाड(25) या दोघांना 3 ऑगस्ट 2023 पासून दोन वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. लिंबगाव येथील गुन्हा क्रमांक 1/2023 मधील राम सदाशिव जाधव(22), तुषार उर्फ भुऱ्या मधुकर माने (24), रितेश उर्फ रित्या दिलीप माने (22) या तिघांना 4 एप्रिल 2023 पासून नांदेड जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. सोनखेड येथील गुन्हा क्रमांक 1/2023 मधील रोहण राजू ससाणे (21) आणि गणेश भुजंग मोरे (21) या दोघांना 15 एप्रिल 2023 पासून एक वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. उमरी येथील गुन्हा क्रमांक 1/2023 मधील मारोती गोविंदराव कावळे (34) आणि मोहन भिमराव पवार (28) या दोघांना 5 सप्टेंबर 2023 पासून सहा महिन्यासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 3/2023 मधील सविता बाबुराव गायकवाड (44) किरण सुरेश मोरे (26) या दोघांना नांदेड जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार केले आहे.
मुंबई पोलीस कायद्यातील कलम 55 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याला अशी शक्ती देण्यात आली आहे की, ज्या माणसांपासून समाजात अशांतता निर्माण होण्याची भिती त्यांना वाटत असेल अशा लोकांना महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 55 प्रमाणे हद्द पार करता येते.
एका महिलेसह 14 जणांना पोलीस अधिक्षकांनी केले जिल्ह्यातून हद्दपार