नांदेड(प्रतिनिधी)-5 हजारांची लाच स्विकारतांना सीबीआयने जेरबंद केलेल्या वरिष्ठ अभियंता विद्युत यास न्यायालयाने आज तुरूंगात पाठवून दिले आहे. आज तरी न्यायालयाने त्याला जामीन दिलेला नाही.
नांदेड शहरातील रेल्वे फलाट क्रमांक 4 वर असलेल्या वरिष्ठ रेल्वे अभियंता विद्युत यास 11 सप्टेंबरच्या सायंकाळी 5 हजारांची लाच घेतांन पकडण्यात आले. त्यानंतर सीबीआयने 12 सप्टेंबर रोजी त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान त्यास पोलीस कोठडीत पाठविले. पोलीस कोठडीदरम्यान सीबीआय पथकाने विद्युत अभियंत्याच्या आवाजाचे नमुने जप्त केले. आज त्यास न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती करत सीबीआय पथकाने इंजि. शिवय्या एम. यास न्यायालयीन कोठडीत पाठवत त्याची रवानगी तुरूंगात केली आहे. आज विद्युत अभियंता शिवय्या एम. याच्यासाठी जामीन पण मागण्यात आला होता. पण प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने त्याला आज जामीन दिलेला नाही. त्यामुळे त्याला तुरूंगात जावे लागले आहे.
पाच हजारांची लाच घेणारा रेल्वे विद्युत अभियंता तुरुंगात