
नांदेड(प्रतिनिधी)-आंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाला वेगळेच वळण लागले आणि त्यानंतर ज्या शासनाने मतदारांना खुश करण्यासाठी तेथील एक अधिकारी सक्तीच्या रजेवर आणि दोन अधिकाऱ्यांना निलंबन करून मतदारांना खुश केले. पण पोलीसांनो तुम्ही पण विसरु नकाच की, तुम्ही पण मतदार आहात, तुमचे कुटूंबिय मतदार आहेत, तुमचे नातेवाईक मतदार आहेत, तुमचे मित्र सुध्दा मतदार आहेत.या बाबीला लक्षात ठेवून येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.

आंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे मराठा आरक्षण आंदोलनाला वेगळे वळण लागले त्याचे पडसाद राज्यभर उमटले. विशेष करून मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र सोडून मराठवाड्यात त्या पडसादांना जास्त भाव आला. आज मनोज जरांगे यांनी आपले आमरण उपोषणपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस पिऊन सा ेडले आहे. पण आजपर्यंत घडलेल्या घडामोडी विसरता येण्यासारख्या आहेत काय? आंतरवाली सराटी येथे झालेला लाठी हल्ला हा पोलीसांनी कोणत्या परिस्थितीत केला होता. हे नेत्यांनी लक्षात ठेवले नाही आणि त्वरीत प्रभावाने पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांन सक्तीच्या रजेवर पाठवले तसेच अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे आणि अंबड विभागाचे पोलीस उपअधिक्षक मुकूंद आघाव अशा अशा दोघांना निलंबित करण्यात आले. शासकीय सेवेत अर्ज, अर्ज चौकशी, प्राथमिक चौकशी, विभागीय चौकशी आणि मग निलंबन हे काही नवीन प्रकार नाहीत. नेत्यांनी यांना सुध्दा सांगितले असेल ज्यांना निलंबित केले आहे की, आम्हाला असे करावे लागते. तुम्हाला काही होवू देणार नाही. पण जर आम्ही चुकलो नाही तर आम्ही कोणा पुढे सुध्दा आपले मस्तक झुकवायचे नसते. कर नही तो डर नही या शब्दांप्रमाणे पोलीसांनी त्यांच्या समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे. आज जालना जिल्ह्यातील संपुर्ण पोलीस दल या तिन अधिकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल दु:खी आहे. एवढेच नव्हे तर या घटनेचा परिणाम महाराष्ट्र पोलीस दलावर झालेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 1 लाख 50 हजारपेक्षा जास्त मंडळी सेवा देत आहेत.
आम्हाला पोलीसांना असे सुचवायचे आहे की, तुम्ही आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने परत घेतलेले आहेत. हे कधीच विसरु नका. कारण लवकरच निवडणुका येणार आहेत. एका पोलीसाने 100 मतदांराचे मन बदलले तर 1 कोटी 50 लाख मतदार बदलतील. आणि या बदलाचा परिणाम येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नेत्यांना घाम फोडेल. झालेल्या प्रक्रियांना आपल्या जीवनातील दुर्घटना आहे असे समजून काही जण विसरतात आणि त्या न विसरण्यासाठीच आम्ही हा शब्द प्रपंच केलेला आहे. तेंव्हा नक्की आमची विनंती लक्षात ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीत नेत्यांना घाम कसा फोडता येईल यावर लक्ष केंद्रीत करा कारण तुम्हाला संघटना नाही म्हणून संघटनेच्यावतीने काही कार्यवाही करण्याचा हक्क तुमच्याकडे नाही पण तुम्ही महाराष्ट्राचे मतदार आहात याबाबीला कदापी विसरु नका तरच आम्ही आमची लेखणी झिजवून काही तरी कमावल्या सारखे आम्हाला वाटेल आणि आपल्याला आपले अस्तित्व दाखवायला मिळेल.